मुद्दा : थिमक्का यांचे प्रेरक कार्य

29

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

त्या दशमान पद्धतीमधील तांब्याच्या एका पैशाच्या आकाराएवढेसे छोटे वटवृक्षाचे बी जमिनीत रुजले की, त्याचे रोपटे होते. त्याला पाणी घातले की, अंकुरल्यानंतर छोटेसे झाड उभारते. ते झाड वाढले की, त्यांच्या फांद्यांना पारंब्या फुटतात व त्या कालांतराने जमिनीत घुसतात व शेवटी नवा विशाल वृक्ष तयार होत जातो. पुढे त्या झाडावर पक्ष्यांचा थवा जमतो, त्यांना खाद्य मिळते, मानवाला दाट सावली मिळते, पर्यावरणाची सोय होते. हीच बाब कर्नाटक राज्यातील बंगळुर जवळच्या एका खेडय़ात वास्तव्याला असणाऱ्या पद्मश्री थिमक्का या 108 वर्षांच्या आजीबाईंच्या लक्षात आली आणि त्यांनी गेली पंचवीस वर्षे दरवर्षी अक्षय असलेल्या वडाची दहा झाडे लावण्याचा व जगवण्याचा वसा सुरू केला. त्या आजीबाईंची सालुमार्दी म्हणजे वृक्षांची रांग अशी ओळख तयार झाली. तरुण वयात त्यांचे चिकल चिक्कल यांच्याशी लग्न झाले, परंतु वय उलटून गेले तरी त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून या जोडप्याने हतबल न होता वृक्ष लागवड व संगोपनाचे काम सुरू केले. सोबतीला काबाडकष्ट व गरिबी होती, परंतु या थिमक्का दांपत्याने निराशा न पत्करता वडाच्या झाडांची लागवड सुरूच ठेवली. त्यामुळे रस्त्याच्या बाजू सजू लागल्या ही निष्काम सेवा जनतेच्या लक्षात आली. तेथील त्यांचे कार्य पाहून ‘पद्मश्री’ हा पुरस्कार त्यांच्या लोकप्रियतेतून प्राप्त करून दिला गेला. दावनगिरी व चित्रदुर्ग या भागात थिमक्का या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातून त्या पुरस्कारप्राप्त ठरलेल्या आहेत. एक अतिसामान्य व गरीब अडाणी महिला एकाकीपणाने निसर्गाने दिलेले देणे सांभाळण्याचे व पर्यावरणाचे मोठे देशकार्य करते.

आपली प्रतिक्रिया द्या