लेख – गणेशोत्सव आणि अनंत पूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विलास पंढरी

गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताची पूजा केली जात असल्याने या दिवसाला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे या उद्देशाने केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेष आणि यमुना या इतर देवता आहेत. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या लाल रेशमाच्या दोऱयाची पूजा केली जाते. पूजेनंतर दोरा पुरुषांच्या उजव्या हातात बांधतात, त्याला अनंत म्हणतात. स्त्रियांच्या डाव्या हातात असाच छोटा दोरा बांधतात त्याला अनंती असे म्हणतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केव्हा आणि कशी झाली, कुणी केली यावर गेल्या काही वर्षांपासून वादविवाद चालू आहेत. या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजांनी पुणे येथे दिले असे दाखले इतिहासात मिळतात. त्यांच्या काळात 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला जात असे. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा 1718 पासून पेशव्यांनी पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत कायम राखली गेली, पण सार्वजनिक गणपती पूजा पेशवाईच्या पतनानंतर बंद झाली.

वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार करून व अनेक मंडळांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देऊन 1893 मध्ये खऱया अर्थाने सार्वजनिक केला. आता आपण पाहत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शिल्पकार लोकमान्य टिळकच म्हणावे लागतील. सार्वजनिक गणपतीची सुरुवात पुण्यापासून सुरू होऊन तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचला आहे. 10-11 दिवसांचा हा महोत्सव गेल्या एक शतकापेक्षाही अधिक काळापासून दिमाखात साजरा केला जात असून या महोत्सवाची सांगता म्हणजे विसर्जन मिरवणूक हा फार मोठा इव्हेंट विशेषतः मुंबई व पुण्यात मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जाण्याची परंपरा आहे. यंदा मात्र कोरोनाने आणलेल्या बंधनांमुळे ‘मिरवणुकीविना विसर्जन’ हे गेल्या 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे. 1897 सालातील पुण्यातील प्लेगची साथ,1961 मधे पानशेत धरण फुटल्याने जलमय झालेले पुणे व 1965 सालच्या हिंदुस्थान-पाक युद्धामुळे ब्लॅक आऊट परिस्थिती या कठीण परस्थितीतही पुण्यात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबईची विसर्जन मिरवणूक अशीच शतकभर अखंडित चालू आहे. मात्र यंदा कोरोनामुळे या परंपरेला बाधा आली आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताची पूजा केली जात असल्याने या दिवसाला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. विष्णूदेवतेला अनुसरून केल्या जाणाऱया या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे या उद्देशाने केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेष आणि यमुना या इतर देवता आहेत. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या लाल रेशमाच्या दोऱयाची पूजा केली जाते. पूजेनंतर दोरा पुरुषांच्या उजव्या हातात बांधतात, त्याला अनंत म्हणतात. स्त्रियांच्या डाव्या हातात असाच छोटा दोरा बांधतात त्याला अनंती असे म्हणतात.

‘अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णूरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस असून ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात.

श्री विष्णूतत्त्वाच्या उच्चाधिष्ठत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे. शेषदेवता श्री विष्णूतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते. म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते.

शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिले जाते.

पूजेसाठी दर्भाचा शेष नाग वापरला जातो. याला दर्भातील विशेष गुणधर्म कारणीभूत आहेत. दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते. दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णूरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते. या लहरींच्या स्पर्शामुळे तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देह कृती आणि कर्म करण्यात संवेदनशील बनतो.’

अनंतव्रतात 14 गाठींचे रेशमी दोरे वापरले जातात. त्याला आपल्या शरीरातील ग्रंथींचा संदर्भ आहे. ‘मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱयाला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते. दोऱयांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱया ग्रंथीपर्यंत वाहणाऱया क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱयाची मंत्रांच्या सहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णूरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोऱयात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारीत दोरा बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते.

तसेच यमुना नदी या व्रतात प्रतीकात्मक घेतली आहे. त्याला धार्मिक संदर्भ आहेत. यमुनेच्या डोहात श्रीकृष्णाने कालिया नागाचा वध करून तिमोगुणात्मक अशा असुरी लहरींचा नाश केला होता. त्यामुळे यमुनेच्या पाण्यात श्रीकृष्ण तत्त्वाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या व्रतात कलशातील पाण्यात यमुनेचे आवाहन करून पाण्यातील श्रीकृष्णतत्त्वस्वरूप लहरींना जागृत केले जाते.

याच कलशावर शेषरूपी तत्त्वाची पूजा केली जाते आणि श्री विष्णूचेच रूप असणाऱया श्रीकृष्णतत्त्वाला जागृत ठेवले जाते. ‘पांडवांना राज्य गमवावे लागले, वनवास व अज्ञातवास नशिबी आला. यातून मार्ग काय असे त्यांनी जेव्हा कृष्णाला विचारले तेव्हा कृष्णाने हे व्रत करण्यास सांगितले होते. गुरुचरित्रातील 42 व्या अध्यायात याचा उल्लेख असून पूर्ण कथाही सांगितलेली आहे.

शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात. नंतर दोरकाची प्रार्थना करून दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. जुन्या दोऱयाचे विसर्जन करतात. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो. हरयाणातही या दिवशी अनंताचे व्रत घेण्याची प्रथा आहे.