गुरुत्वाकर्षण – सगळीकडे वेगळं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

एक सफरचंद झाडावरून पडताना पाहिल्याने न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली, हे माहिती आहेच. ही गोष्ट साधारण 1665 वा 1666ची. त्यानंतर काही शतकांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ‘थिअरी ऑफ जनरल रिलेटीव्हिटी’चा सिद्धांत मांडला. त्यानुसार गुरुत्वाकर्षण हे आकर्षण वा शक्ती नसून ते वस्तुमान असलेल्या वस्तूंनी आजूबाजूच्या परिमाणांवर टाकलेला प्रभाव ज्यामुळे वस्तू इतर वस्तुमानांना खेचू शकते असे वाटते.

मला आठवतं त्याप्रमाणे पृथ्वीवरच्या माणसाचं वा वस्तूचं वजन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतं. अंतराळ प्रवासात अंतराळवीरांना वजनरहित अवस्था अनुभवास येते त्याबाबत खूप जणांना हेवा वाटू शकतो. शिवाय चंद्रावर आपलं वजन कमी असू शकतं हे ज्ञान मिळाल्यावर अनेकांना तिथे जाऊन वजन करावंसं वाटलं होतं. काहीही असलं तरी हे खरं आहे की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण व वस्तूंचं वजन यांचा सरळ संबंध आहे.

पण म्हणून पृथ्वीवर कुठेही वजन केलं तरी ते सारखंच असणार अशी आपली समजूत असेल तर ती मात्र सपशेल चुकीची आहे, हे नासानं अलीकडेच दाखवून दिलं आहे. नासाचं ‘ग्रॅविटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपरीमेंट (GRACE)” वैज्ञानिकांना संपूर्ण ग्रहावरील गुरुत्वाकर्षणाच्या पातळीकडे पाहण्यास मदत करते. रंग GRACEच्या साहाय्याने मोजलेल्या गुरुत्वाकर्षणातील विसंगती दाखवतात. अगदी साध्या माणसांसाठी पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण सगळीकडे सारखंच असतं. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यात विसंगती दिसून येते. पह्टोतील लाल रंग आदर्शपेक्षा जास्त गुरुत्वाकर्षण दर्शवतं, तर निळा रंग सर्वात कमी.
पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण आपल्याला व वस्तूंना जमिनीवर ठेवतं. ही अदृश्य चुंबकीय शक्ती या आपल्या ग्रहावर सगळीकडे पसरली आहे आणि ती एवढय़ात इथून जाईल असं दिसत नाही. शिवाय ही शक्ती संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. हे विचित्र वाटलं तरी खरं आहे आणि जेव्हा हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं तेव्हा सगळेच आश्चर्यचकीत होतात. जगात काही ठिकाणी अशी पर्यटनस्थळं आहेत जिथे पर्यटकांना चुंबकीय शक्ती कशी वेगळीच आहे हे दाखवण्याचा कार्यक्रम राबवला जातो आणि ते पाहून पर्यटक खुशीत घरी जातो.

नासाच्या म्हणण्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण हे वस्तुमानावरून ठरतं आणि पृथ्वीचं वस्तुमान हे सगळीकडे सारखं पसरलेलं नसल्याने चुंबकीय शक्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. काळानुसारही ती वेगळी असू शकते. नासाच्या GRACE मुळे वैज्ञानिकांना पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करणं शक्य झालं. मग त्यांनी चुंबकीय नमुन्याचं एक थ्रीडी मॉडेल जगाला पेश केलं. यात पृथ्वीचा आकार आपण नेहमी गृहीत धरतो तसा अगदी गोल नसल्याचं दिसलं आणि त्यात चुंबकीय क्षेत्र सगळीकडे सारखं नसल्याचं निदर्शनास आलं.

टेक्सास विश्वविद्यालयातील सेंटर फॉर स्पेस रिसर्च, टेक्सास, ऑस्टीन, नासाची जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी, पॅसाडेना, पॅलिपहर्निया, जर्मन स्पेस एजंसी आणि जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायंसेस, पॉट्सडॅम या सगळ्यांनी पुढाकार घेऊन मार्च 2002मध्ये जुळे सॅटलाईटस प्रक्षेपित केले. त्यांनी पृथ्वीच्या चुंबकीय भागाचे मोजमाप केलं, ज्यामुळे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीच्या नैसर्गिक पद्धतींबाबत शोध लावता आले. या सॅटलाईटस्चं मिशन 27 ऑक्टोबर 2017मध्ये संपवलं. कारण GRACE-2 वरील बॅटरीचं आयुष्य संपलं.

तरीही गुरुत्वाकर्षण ही सर्वात कमकुवत शक्ती आहे. सगळ्यात ताकदीची शक्ती आहे – न्युक्लियर शक्ती. त्याखालोखाल इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती, त्यानंतर कमकुवत न्युक्लियर शक्ती आणि अगदी शेवटी गुरुत्वाकर्षण! वस्तुमान वा ऊर्जा असलेल्या दोन वस्तूंमधील आकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण. हे अनेक ठिकाणी दिसतं. एखादा दगड पुलावरून पडला वा एखादा ग्रह एका ताऱयाभोवती फिरतो वा चंद्रामुळे सागराला लाटा उत्पन्न होतात, अशा अनेक बाबींमध्ये गुरुत्वाकर्षण ही सगळ्यात जास्त ओळखीची व सहज कळणारी अगदी मूलभूत शक्ती आहे. ग्रह, तारे, सूर्यमाला, आकाशगंगा हे सगळं एकत्र गुंफण्याचं काम ही कमकुवत शक्ती करते. तरी आण्विक आणि अणूविषयक पातळीवर इतर शक्तींच्या मानाने गुरुत्वाकर्षणाचा जवळजवळ काहीच परिणाम होत नाही.

[email protected]