
>> विनायक रा. वीरकर
सध्या कांद्याचे व टोमॅटोचे भाव कोसळले असून शेतकरी संकटात सापडले आहेत, त्यांना संकटमुक्त करण्यासाठी मी खालील उपाय सुचवत आहे. कांदा वजनाला जड असून टिकाऊ नसतो त्यामुळे कांद्यापासून फ्लेक्स, पावडर व पेस्ट वजनाला हलक्या असून त्या चार ते सहा महिने टिकू शकतात आणि नंतर फ्रीजमध्ये महिनाभर राहू शकतात. शेतमाल अल्ट्राव्हायोलेट किरण, किरणोत्सव गॅसरेज, नायट्रोजन व ड्रायरमध्ये प्रक्रिया करून उदाणार्थ कांदा पेस्ट पावडर, टोमॅटो व फळाचे ज्यूस फळांपासून जेली, लेदर (आंबा पोळ्यासारख्या सुकवून) तसेच सर्व भाज्या सुकवून निर्यात केल्यामुळे शेतकर्यांना परकीय चलन मिळून शेतमाल टिकवण्यासाठी परदेशातून यंत्रसामुग्री व परकीय तंत्रज्ञान आयात करता येईल.
टोमॅटोपासून पेय (ज्यूस) पेस्ट व केचअप बनवून निर्यात करता येईल. त्यासाठी शेतकर्यांनी सिंडीकेट बनवून स्वतःचे मार्केटिंग करावे लागेल त्यासाठी दलालांकडे माल विकू नये. शहरात बांधलेल्या मंडईत बरेच गाळे रिकामे असतात. तेथे रोज विक्री करावी तसेच आठवडे बाजार प्रत्येक शहरात सुरू करावेत व त्यात भाग घ्यावा, परदेशातून येऊन कोका कोला, पेप्सी, नेस्ले मॅकडोनाल्डस् वगैरे कंपन्या हिंदुस्थानात मार्केटिंग करून शेतमालावर अमाप पैसा कमवत आहेत, परंतु आपले शेतकरी आपला माल आपल्याच देशात योग्य भावाने विकू शकत नाहीत हे दुर्दैव आहे. श्रीमंत शेतकर्यांनी आपला पैसा चैनीमध्ये न उडवता (उदा. महागड्या गाड्या, बंगले व सोने) शेतमाल टिकवण्यासाठी शेतमाल प्रक्रिया कारखाने काढावेत व शेतकर्यांनी शेतमाल दलालांना न देता स्वतः मार्केटिंग करावे व काही माल निर्यात करावा.
विरोधी पक्षांनी राजकारण न करता साखरकारखान्यांनी व साखरसम्राटांनी शेतमाल प्रक्रिया कारखाने काढण्यास मदत करावी, शेतकरी सरकारला कोणताही टॅक्स भरत नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी सरकार शेतकर्यांना योग्य ती मदत करू शकत नाही. तरी सरकारने पाच लाखांवर उत्पन्न असलेल्या व श्रीमंत कोट्यधीश शेतकर्यांना टॅक्स लावावा व शेतमालावर प्रक्रिया करणार्या व निर्यात करणार्या शेतकर्यांना टॅक्समध्ये काही सूट द्यावी. सध्या इंटरनेटवर शेतमालावर प्रक्रिया करणारी यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान उपलब्ध आहे तसेच जरूरी लागली तर इस्राएल, अमेरिका, डेन्मार्क, हॉलंड देशांची मदत घ्यावी. सर्व शेतमाल भाज्या, फळे, अंडी, मासे यांस सुकवण्यासाठी मी hcras to Dry Foods by Deanna Delong (H. P. Book U. S. A) सुचवत आहे, त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा.



























































