मुद्दा – गुंतागुंतीची ‘गुंतवणूक’

314

कामगार मंत्रालयाच्या नव्या प्रस्तावित मसुद्यानुसार भविष्य निर्वाह निधी ज्यावर निवृत्त कर्मचाऱयांचा निवृत्तीनंतर ‘उदरनिर्वाह’ होतो अशा भविष्य निर्वाह निधीचा निधी आता शेअर बाजारात ‘शेअर’ म्हणजेच गुंतविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ईपीएफओ सदस्यांना जास्तीत जास्त परतावा देण्याचा हा उदात्त हेतू जरी असला तरी बाजारातील होणाऱ्या जोखमीचे दायित्व कुणी घ्यायचे? कारण शेअर बाजार म्हटला तर उतारचढाव होणारच. मग निवृत्तीवेळीस जर बाजार कोसळला तर आयुष्यभराच्या कमाईचे कवडीमोलात होणाऱ्या पैशांचे निवृत्त कर्मचाऱ्याने काय करायचे? कारण हा निधी खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार आणि त्याला हाताळणाऱे फंड मॅनेजर पण तितकेच सक्षम मिळतीलच याची जबाबदारी कामगार मंत्रालय घेणार आहे का? तसेच ‘एनपीएस’मधून ‘ईपीएफ’मध्ये परतणाऱ्या सदस्यांना पुन्हा नवीन सदस्य गणले जाणार म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात. एकंदरीत बाजारातील होणाऱ्या या गुंतागुंतीच्या ‘गुंतवणुकीत’ जोखीमच अधिक वाटते.

>> दत्तप्रसाद शिरोडकर

आपली प्रतिक्रिया द्या