शेणापासून आरोग्यदायी कोल्हापुरी चप्पल

>>  किरण माळी

कर… कर वाजणाऱ्या कोल्हापुरी चपलमुळे व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच छाप पडते. त्यामुळेच चामडय़ापासून बनवलेल्या या कोल्हापुरी चपलेची जगभर ख्याती पसरली आहे, मात्र कोल्हापुरातील एका व्यावसायिकाने चक्क गाईच्या शेणापासून आरोग्यदायी कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. सध्या या चपलेची जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या बाजारपेठेत फॅशनच्या विविध प्रकारच्या चपला उपलब्ध आहेत, परंतु अनेकदा या फूटवेअरमुळे पाय दुखण्याची समस्या निर्माण होते, मात्र शेणापासून बनवलेली ही चप्पल इतर चपलांपेक्षा हटके आणि आरोग्यदायी आहे. येथील ‘टोटल ग्रीन सेल्स ऍण्ड सर्क्हिसेस’ या कंपनीचे मालक किरण माळी यांनी ही गाईच्या शेणापासून चप्पल तयार केली आहे.

किरण माळी यांनी आपल्या कंपनीमार्फत गाईच्या शेणापासून आणि गोमूत्र कापरून चप्पल तयार केली असून तिला ‘गोमय पादुका’ असे नाव दिले आहे. गोमय पादुका गेल्या दोन वर्षांपासून तयार करण्याचे काम करत आहे, पण कोल्हापुरी चप्पलचे अनेकांना आकर्षण असते. त्यामुळेच गोमय पादुका तयार करण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले.

या गोमय पादुका केदिक रंग, गोक्रिट (बांधकामासाठी लागणाऱया किटा), धूप, शोपीस, कॉलपीस अशा अनेक गाईच्या शेणापासून तयार करण्यात येत आहेत. या पादुका घर किंवा ऑफिसमध्ये वापरासाठी उपयुक्त आहेत. धावपळीच्या जीवनात चांगले आरोग्य लाभावे, यासाठीच या पादुका तयार केल्याचे ते सांगतात.

अशा बनवतात पादुका

गोमय पादुका बनकण्यासाठी फक्त देशी गाईचे शेण, लाकडाचा भुस्सा, लाकडी मैदा या गोष्टी कापरल्या जातात. यासाठी फक्त देशी गाईचे आणि ताजे शेणच कापरले जाते. त्यामध्ये बाकीचे दोन घटक मिसळून या पादुका बनवल्या जातात. त्यानंतर त्या केगकेगळय़ा प्रक्रियेच्या माध्यमातून टिकाऊ बनवल्या जातात.

गेली दोन वर्षे अशा गोमय पादुका तयार करत आहेत. या पादुका वापरल्यानंतर आरोग्याचा होणारा विविध त्रास कमी झाल्याचे ग्राहक सांगतात. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचा त्रास अशा गोष्टींवर या पादुका परिणामकारक ठरल्याचे किरण माळी सांगतात.