विशेष : गणपती बाप्पा मोरया

239

>>प्रा. वैदेही पेंडसे, संस्कृत अभ्यासक

आज गणेश जयंती. बाप्पा आपल्या सगळ्यांचाच लाडका. त्याची उपासना आपल्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणारी असते. अथर्वशीर्ष… बाप्पाचं प्रिय स्तोत्र. आपले आजी-आजोबा याची आवर्तने नेहमीच करतात. पाहूया अथर्वशीर्षाचा गर्भीतार्थ आणि त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम.

स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. आपल्या संस्कृत भाषेला ‘गीर्वाण भाषा’ म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साया वाङमयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. ‘रामरक्षा स्तोत्र’, ‘व्यंकटेश स्तोत्र’, ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. यापैकी अथर्वशीर्ष ज्येष्ठ नागरीकांच्या मनाच्या स्थिरतेसाठी खूप आवश्यक आहे. ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी हे स्तोत्र फारच परिणामकारक असल्याचं सिद्ध झालंय.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात होती. आजच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य नसलं तरी अर्थवशीर्षाची एक-दोन आवर्तने दररोज म्हणायला काहीच हरकत नाही. स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणतेही किलमिश राहणार नाही. ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण, मंत्रोच्चार होत असतील तर मन उत्साहपूर्ण होते. दररोज अथर्वशीर्ष म्हणायला हवं असं पूर्वजांनीच म्हणून ठेवलंय. त्यामागेही शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टीकोनच होता. श्लोक म्हटल्याने मनावरची मरगळ दूर होते. शरीराला आलेला आळस दूर होतो. यामुळे आपण एकदम प्रसन्न होतो. या ऍक्युप्रेशरमुळे चेहऱयावरचे 25 ते 30 पॉइण्टसना फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. अथर्वशीर्ष म्हटल्यानेही सकाळी देवाचं स्मरण होतं.

अथर्वशीर्षाचे महत्त्व…
> थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुनरूच्चारणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय.
> बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.
> ॐकार अशा या गणेशाचे पूजन अथर्वशीर्ष म्हणून केले जाते.
> अथर्वशीर्षाच्या पठणाने सुखप्राप्ती होते, पातकांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात.
> धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरूषार्थांचा लाभ होतो.

आवर्तने कशी कराल?
अथर्वशीर्षाचा पाठ एकदा, अकरा वेळा, एकवीस वेळा किंवा एक सहस्र वेळा केला जातो. हे स्तोत्र एकदा वा कितीही वेळा म्हटले तरी त्यातून होणारा वैद्यकीय फायदा सारखाच असतो. कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे, असे म्हटले आहे. हा निसर्ग म्हणजेच इश्वर हे म्हणणे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर नक्कीच पटेल.

कणखर मनासाठी आवश्यक…
> अथर्वशीर्ष पठणामुळे मन एकाग्र होते. कारण शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर मात करू शकतो.
> मन स्थिर असेल तर आपण ते वर्तमानात ठेवून प्रत्येक काम करू शकतो.
> बऱयाच लोकांचे मन काम करताना अस्थीर असते. मनाची एकाग्रता वाढण्यासाठी अथर्वशीर्ष म्हणणे फायदेशीर ठरेल. म्हणूनच अथर्वशीर्षाचे पठण ज्येष्ठांसाठी चांगले.
> अथर्वशीर्षाच्या आवर्तनाने निर्माण होणारी कंपने उच्च रक्तदाब, हृदयरोगासारख्या विकारांवर फार उपयुक्त ठरतात.
> अथर्वशीर्ष म्हटल्याने मन शांत राहाते. मनात वाईट विचार येत नाहीत. विनाकारण चिंता मनास सतावत नाही.
> अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे, असे म्हटले आहे.
> निसर्ग म्हणजेच इश्वर हे म्हणणे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर नक्कीच पटेल.

आपली प्रतिक्रिया द्या