
>> दिलीप जोशी
विशाल अवकाशाला नक्षत्रांचे लेणे लाभले आहे. ही नक्षत्रे विश्वरूप उलगडून दाखवतात म्हणून आपल्यासाठी ते नक्षत्रांचे देणे म्हणूया. सध्याच्या लॉकडाऊन काळात गेले दीड वर्ष घरी बसूनच लेखन-वाचन सुरू आहे. घरच्या छोटय़ाशा ग्रंथसंग्रहालयातील पुस्तके चाळताना अवचितपणे आपल्या ‘आभाळमाये’चा वेध घेणारे ‘नक्षत्रलोक’ हे पंडित महादेवशास्त्र्ााr जोशी यांचे पुस्तक हाती आले. 35 वर्षांपूर्वी खगोल अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा इंग्लिश पुस्तकांबरोबरच सहजसोप्या शब्दात अवकाशाची ओळख करून देणारी पुस्तकेही आणली. त्यात गो. रा. परांजपे यांचे आकाश नकाशासह आवश्यक माहिती देणारे ‘हा तारा कोणता?’ हे पुस्तक होते आणि महादेवशास्त्र्ााRचे ‘नक्षत्रलोक’सुद्धा. एकोणिसाव्या शतकात शं. बा. दीक्षित यांनी लिहिलेले ज्योतिर्विलास हे पुस्तकही वाचनीय आहे. नंतर प्रा. मोहन आपटे यांची खगोलावरची बरीच पुस्तके आली. आमच्या संस्थेनेही प्रदीप नायक लिखित ‘तारांगण’सारखी (मराठी, इंग्रजी) पुस्तके प्रसिद्ध केली.
आधुनिक शैली आणि अद्ययावत माहिती असलेल्या आमच्या पुस्तकांना चांगला प्रतिसाद लाभला. त्या मानाने ‘नक्षत्रलोक’ बरेच जुने म्हणजे 1956 मध्ये प्रसिद्ध झालेले, अवकाशाचा परिचय करून देणारे पुस्तक. यात शास्त्र्ााrजींनी ‘केसरी’मधून लिहिलेल्या खगोलीय लेखमालेचा तो संग्रह. लोकमान्य टिळकही गणिती आणि खगोल अभ्यासक होतेच. तेव्हा त्यांच्या वृत्तपत्रात अशी लेखमाला येणे उचितच होते. पुढे 1973 मध्ये पुण्याच्या ‘जोशी ब्रदर्स’तर्फे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. तेच पुस्तक मी वाचत होतो.
रात्रीचे आकाश पाहायची इच्छा असलेल्या कोणालाही ते सहज दिसते. मात्र ते ‘सहज’ समजत मात्र नाही. काही ठळक नक्षत्रे वगळता इतर अगणित तारकांची माहिती अभ्यास करून घ्यावी लागते. आकाश निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते. मग आकाशही वाचता येते आणि नक्षत्रांचे लोभसवाणे देणे नजरेत भरते. त्यापूर्वी त्याविषयी काही पुस्तके जरूर वाचावीत. हे आताच सांगण्याचे कारण म्हणजे आता जून महिना सुरू झालाय. प्रत्यक्ष आकाश यानंतर हळूहळू ढगाआड जाईल. अधेमधे उघडीप मिळाली तरी रात्रभराचे सलग आकाशदर्शन अशक्यच. त्यामुळे या चार महिन्यांत खगोलाची माहिती वाचनातून घेतली आणि काही सिद्धांत सोप्या शब्दात समजून घेतले तर दिवाळीनंतर अवघे आकाश आपलेच असेल. तोपर्यंत कोविडचे संकट पूर्णपणे टळलेले असेल अशी अपेक्षा करूया. त्यानंतर ‘हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण’ याचा प्रत्यय घेता येईल.
महादेवशास्त्र्ााRनी त्यांच्या अवघ्या 112 पानी पुस्तकात 1952 मधल्या पुण्यातून केलेल्या आकाश निरीक्षणावर आधारित अतिशय काव्यमय, प्रासादिक भाषेत लिहिलेय. खगोलशास्त्राविषयीचे वैदिक संदर्भ देतानाचे आधुनिक खगोल अभ्यासाचाही विचार मांडलाय. कृत्तिका, मृग, चित्रा, स्वाती अशी अनेक नक्षत्रे आणि आकाशगंगा, राशी तसेच आधुनिक काळात शोधल्या गेलेल्या ताराकासमूहांचा सुंदर परिचय करून दिलेला आहे. शास्त्राrजी आकाशाचा आणि आपला संवाद घडवतायत असे हे पुस्तक इतक्या वर्षांनंतरही वाचताना वाटते. अर्थात गेल्या सत्तर वर्षांत आकाश निरीक्षण अवकाशस्थ दुर्बिणीपर्यंत पोहोचल्याने आणि अधिक अचूक झाल्याने काही गोष्टीतले बदल जाणवतात. उदाहरणार्थ शास्त्राrजींनी त्यावेळच्या माहितीनुसार मृगातील बिटलग्युज किंवा ‘भरत’ ताऱयाचे अंतर पृथ्वीपासून 300 प्रकाशवर्षे अंतरावर तर त्यातीलच राजन्य 540 प्रकाशवर्षे अंतरावर आहे असे म्हटलेय. प्रत्यक्षात आताच्या गणितानुसार ही अंतरे अनुक्रमे 450 आणि 729 प्रकाशवर्षे एवढी आहेत.
हा काळाचा महिमा आहे. कोणत्याही ज्ञानशाखेत नवनवीन गोष्टी येत असतात आणि जुन्या संकल्पना मागे पडतात, पण म्हणून त्या काळात केलेला अभ्यास कमी मोलाचा ठरत नाही. स्वतः महादेवशास्त्राrच प्रस्तावनेत म्हणतात. ‘नक्षत्रलोक हा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय असला तरी वैज्ञानिकांसाठी संशोधनाचा विषय आहे. या पुस्तकातील माहिती शास्त्राला धरून असली तरी ती प्राथमिकच आहे हे नम्रपणे नमूद करतो. या पुस्तकाच्या वाचनाने एखाद्याची नक्षत्रविषयक जिज्ञासा जागृत झाली तर तिची पूर्तता करण्यासाठी त्याला अन्य ग्रंथांचे वाचन करावे लागेल आणि आता मराठीतही खगोलीय ग्रंथांची रचना होऊ लागली आहे.’ शास्त्राrजींचे हे विचार प्रामाणिक आणि त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारे म्हणावे लागतील. कुठे मिळाले तर हे पुस्तक जरूर वाचा.



























































