मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ललित चव्हाण

धुळे जिह्यासह उत्तर महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित असलेल्या मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गात एकूण ३८ स्थानके असतील. यात सातपैकी जिह्यात तीन प्रमुख स्थानके असतील. या मार्गविषयक प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला सादर झाला आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून साडेतीन हजार हेक्टरवर भूसंपादन होईल.

– मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग ३५७.३७ किलोमीटरचा असेल. या विद्युतीकरणावर आधारित रेल्वेचा वेग किमान प्रतितास ११० किलोमीटर असेल. यात २५ लोडिंग स्टेशन असतील. मार्गात आठ महत्त्वाचे पूल असतील. तसेच १३१पूल, २९०लहान पूल असतील. १७ बोगदे असतील. ते २७.७५ किलोमीटरमध्ये ठिकठिकाणी असतील. सर्वाधिक लांबीचा बोगदा ६.२६ किलोमीटरचा असेल.असतील.

– या रेल्वेमार्गात मालेगाव, धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंधवा, धामनोद, महू अशी सात महत्त्वाची स्थानके असतील.

– उत्तर महाराष्ट्रातून १८६ किलोमीटर तर मध्य प्रदेशातून १७१.३५ किलोमीटरचा मार्ग असेल. हा रेल्वेमार्ग मुंबई-आग्रा महामार्गाला अधिकतर समांतर असेल.

अशी असतील ३८ रेल्वे स्थानके

नाशिक जिल्हा : मनमाड, कुंदलगाव, चोंढी, वऱहाणे, नगाव, मालेगाव. चिखल ओहोळ, झोडगे.

धुळे जिल्हा : आर्वी, हेंद्रूण, बोरविहीर, धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा, दभाषी, शिरपूर, हाडाखेड, पळासनेर.

मध्य प्रदेश : बलवाडी, अंजनगाव, सेंधवा, ओझर, जुलवानिया, लिंगवा, खजुरी, कुंदलमाल, ठिकरी, निमराणी, धामनोद, भोदल, ककरडा, बैरापुरा, कमदपूर, नंदेर, केलोड, महू.