दखल – चांगल्या गोष्टी घडवणाऱ्या महाशक्तीचा पुनर्शोध

>> बी. एन. घारपुरे

तुम्ही जन्मतःच प्रभावशाली होता, तुमची काळजी घेतली जावी यासाठी लोकांना पटवून देणारे होता; परंतु त्यानंतर तुम्हाला तुमच्या या शक्तीचे दमन करण्यासाठी नियमांचे पालन करणे तुम्हाला शिकवले गेले. तसेच तुमची वेळ येईपर्यंत वाट पाहण्यासाठी आणि तुम्हाला वाटते त्याप्रमाणे न वागण्यासाठी शिकवण्यात आले. त्यामुळे तुम्हाला वाटते त्या पद्धतीने तो प्रभाव काम करत नाही. कारण तुम्हाला वाटते त्याप्रमाणे तुम्ही स्वतः विचार करत नाही. पूर्वीच्या काळातील काही चुकीच्या संकल्पना बघा. अधिक मागणे याचा अर्थ लोकांच्या नजरेतून उतरणे. त्याचाच परिणाम म्हणून वाटाघाटी करण्याबद्दलच्या तुमच्या उपाययोजना तुम्हाला कमी प्रभावशाली बनवतात. अशी एखादी गोष्ट शोधा, जी इतरांवर सर्वाधिक परिणाम करते. करिश्मा कसा करायचा ते शिका. नावीन्यपूर्णतेने आणि सहजतेने व्यवहार करा आणि अधिक उशीर होण्यापूर्वीच लोकांमधील दुष्प्रवृत्ती ओळखा.

‘इन्फ्लुअन्स इज युअर सुपरपॉवर’ हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात, संस्थेत आणि कदाचित इतिहासातदेखील बदल कसा घडवायचा ते शिकवेल. प्रभावाप्रतीचा हा एक असा नैतिक दृष्टिकोन आहे, जो प्रत्येकाचे आयुष्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून होईल.

इन्फ्लुअन्स इज युअर सुपरपॉवर

 लेखक : जो चान्स

 अनुवाद : अंजली धानोरकर

 प्रकाशन : साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर

 पृष्ठसंख्या : 280  किंमत : 350 रुपये