न दुखणारं इंजेक्शन…

693

>> संजीवनी धुरी-जाधव

इंजेक्शनची भीती अगदी अगदी मोठय़ा माणसांनाही वाटते. पण आता इंजेक्शन दुखू नये यावर खुद्द डॉक्टर्सनीच काम सुरू केले आहे…

इंजेक्शनला घाबरणाऱया लहान मुलांसाठी खुशखबर आहे. आता इंजेक्शनच्या सुईची तुम्हाला भीती काटणार नाही. कारण इंजेक्शन आता तुम्हाला रडवणार नाहीय. वेदनेशिवाय अवघ्या क्षणात इंजेक्शन टोचले जाणार आहे. विश्वास बसत नाहीय ना? पण हे खरंय… हाफकिन, आयआयटी, एम.जी.एम., आरोग्यसंस्था क के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी एकत्र येऊन वेदनारहित इंजेक्शनचे उपकरण बनवण्यात आले. लककरच या उपकरणाचे पेटंटही मिळवण्यात येणार असून रोजच्या वापरात आणण्याचाही प्रयत्न असणार आहे. याविषयी अधिक माहिती हाफकिनच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांच्याकडून जाणून घेऊया.

हाफकिन संस्थेने नुकताच ‘हॅकॅथॉन 2019’ हा संशोधन महोत्सव भरवला होता. यंदा वेगवेगळ्या क्षेत्रांतील 30 ते 40 डॉक्टर मंडळींना बोलावले होते. त्यांनी आपल्या क्षेत्रात काय उणिवा आहेत किंका आपल्या क्षेत्रात आणखी काय करण्याची गरज आहे याबाबत विचार मांडले होते. त्या 40 प्रकल्पांमधून 19 प्रकल्प निवडले. या हॅकेथॉनमध्ये संशोधनावर आधारीत उद्योग करायचे आहेत असेच लोक होते. मग आम्ही या डॉक्टर लोकांमध्ये ग्रुप पाडले. म्हणजे एक ग्रुप बायोलॉजिकल डॉक्टरांचा ग्रुप, काही मेकॅनिकल इंजिनीयर्सचा वेगळा ग्रुप केला. यात आयटीवालाही असू शकतो. चार लोकांचा एक गट, असे दहा गट बनवले. सगळ्याच समस्या मेडिकलशी संबंधित होत्या त्यामुळे प्रत्येक गटात एकेक डॉक्टर आवश्यक होता. या दहा गटातल्या लोकांना आम्ही आमच्याकडील 19 प्रकल्पांपैकी आवडलेला विषय निवडायला सांगितले. त्यातून त्यांनी दहा प्रकल्पांची निवड केली. त्याच्यात आम्ही इंजिनीअर, मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल आणि डिझायनर यांना त्यांच्या आवडीच्या विषयाला जॉईन व्हा असे सांगितले आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तो तज्ञ एकएक राहील अशीच चारजणांची टिम तयार केली, असे डॉ. निशिगंधा नाईक सांगतात.

पुढे त्या म्हणतात, प्रत्येक ग्रुपला संपूर्ण कल्पना यावी यासाठी आम्ही समस्या आणि व्हिडीओ क्लिप्सही दाखवल्या होत्या. त्यामुळे त्यांना समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. त्यांनी काम करायला सुरुकात केली. शनिवार आणि रविवार दुपारपर्यंत त्यांनी उपकरण पूर्ण केले. अर्धा वेळ समस्या समजायला आणि उरलेले चोवीस तास त्यावर काम करायला आणि नंतर त्याचे सादरीकरण असं त्यांनी काम केले. ज्यांनी पूर्वी काही संशोधन आधारित उद्योग केले. इन्क्युबेटरमध्ये त्यांनी स्वतः काम केले किंवा ज्यांनी हॅकथॉनमध्ये भाग घेतला अशी माणसं प्रत्येक ग्रुपला मार्गदर्शक म्हणून लाभले होते. यासाठी आम्हाला आयआयटीचे अन्य पार्टनर त्याच्यामध्ये के. जे. सोमय्या कॉलेज आणि एमजीएम हेल्थ सायन्स हे लोकही सहभागी झाले होते. त्यांचे विद्यार्थी, एखाद दुसरा मेंटर म्हणून सहभागी झाले होते. त्यांना प्रोटो टाईप अपेक्षित होतं. नुसतं डिझाईन नाही तर त्याचे मॉडेल बनवायचे होते. तो नमुना दाखवून तसं काम केल्याने समोरच्याला ते अधिक स्पष्ट होत असल्याने त्यांनी हे सगळं सादर केलं. त्यापूर्वी त्यांना कशा पद्धतीने सादर करायचे हेही सांगण्यात आले होते. तुमची संकल्पना काय ती स्पष्ट करा, तसंच ती केल्याने काय फायदा होणार आहे जेव्हा त्रुटी म्हणून करताय ती कशा पद्धतीने दूर होणार आहे. त्याच्यामध्ये आणखी काही फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे उद्योग म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार आलाच. मार्केटिंग आले हेही कसं आहे, त्याला किती काक आहे हेही सादर करायला पाहिजे आणि मग सगळ्या दहा गटांनी आपापले प्रकल्प सादर केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आले होते. सगळेच इतके उत्तम होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे कौतुक म्हणून पुस्तक दिले.

जे मेंटर होते त्यांनी अगदी आपुलकीने या गटांबरोबर काम केले. त्यांनी त्यांच्या गटातला उत्तम निवडला. त्याला विशेष पुरस्कार देण्यात आला. अशा पद्धतीने दहा प्रोटोटाइप तयार करण्यात आले. आता हे प्रोटोटाइप झाल्यावर असे लक्षात आले की याची मालकी कोणाकडे तर याच्यामध्ये तो ग्रुप आणि ज्यांनी ती संकल्पना मांडली ते मिळून ठरवू शकतात पुढे त्यावर काम करायचे की नाही ते. पुढे त्यांना एकमताने न्यायचे असेल तर त्यांनी एकमताने ठरवावं आणि पेटंट करायचे तर करावे असे डॉ. नाईक यांनी व्यक्त केले.

असे असेल इंजेक्शन…
लहान मुलांना विविध प्रकारची लस द्यावी लागते. बऱ्याचशा लशी त्यांना बंधनकारक असतात. लहान मुलांना लस टोचणे हा एक डॉक्टर आणि मुलांच्या पालकांसाठी एक आव्हानच असते. त्यामुळे मुलांना इंजेक्शन देताना जवळपास पंधरा ते वीस मिनिटे वाया जातात. काहीजण इंजेक्शनच्या नुसत्या नावीनेच गळून जातात. यावर काय करता येईल? शेवटी ती वेदना असते. त्याचा जास्त त्रास होत असतो. अशा दृष्टीने त्यांना काय करता येईल तर ठरवा असे सांगितल्यावर हे घडय़ाळासारखे छोटे उपकरण आहे. इंजेक्शन देण्यापूर्वी त्या जागी ते ठेवून त्यानंतर इंजेक्शन दिले तर वेदनेची जाणीव होत नाही. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करून त्याचा उपयोग करुन हे उपकरण तयार करण्यात आले आहे. ही पूर्ण प्रक्रिया अवघ्या अर्धा ते एक मिनिटामध्ये पूर्ण होणारी आहे. इंजेक्शनची सुई टोचल्यावर होणारी वेदना जाणवू नये, हे या उपकरणाचे मुख्य प्रयोजन आहे. त्यामुळे मुलांना वेदनेची जाणीव होत नाही. ओमकार प्रविण जोशी, रविकुमार केसवानी, प्रतिक धवन, अभिषेक श्रीवास्तव, मेन्टर पुजन ढोलकिया यांनी हे उपकरण बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या