ठसा – राजा उपाध्ये

>> विद्या शेवडे

ज्येष्ठ संगीतकार .वा उपाध्ये ऊर्फ राजा उपाध्ये यांनी नाटय़, चित्रपट क्षेत्रांत 1960 ते 1980 या काळात चांगलाच ठसा उमटविला होता. मुंबई आकाशवाणीचे तर ते मान्यताप्राप्त संगीतकार होते. पोस्टासारख्या रूक्ष खात्यात आपली नोकरी संभाळून ते आपला संगीताचा ध्यास पूर्ण करत होते. केवळ नशिबाची साथ कमी मिळाल्याने ते मागे राहिले

आई तुझा आशीर्वाद, अष्टविनायक श्रृतिदर्शन, गणराज नटला,’ चाफा बोलेना, मालवणी खाजा, त्या शामल संध्याकाळी, पंचमहाभूत स्तोत्र, तीर्थसाई क्षेत्रसाई अशा अनेक त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांना आपल्या सुमधूर स्वरांनी प्रथितयश गायक सुरेश वाडकर, अजित कडकडे, उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर, शिवानंद पाटील, उदय उपाध्ये, मंगला केळकर यांनी कॅसेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले. ‘संस्कारहा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केला, तरबने सुहागनया हिंदी चित्रपटाची गाणी त्यांनी स्वरबद्ध केली होती, पण काही कारणाने तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सहयाद्रीच सोनं, शांती संग्राम, पळसाला पाने तीन, अमलदार, व्याध संगीतिका ही त्यांनीसंगीतबद्धकेलेली नाटके त्याकाळी लोकप्रिय झालीच तरगीतयामिनीहा राजाभाऊंनी संगीतबद्ध केलेला प्रकाश बोर्डवेकर यांच्या गीतांचा कार्यक्रमही त्यांनी रसिकांसाठी सादर केला होता त्याचे 15 ते 20 प्रयोग झाले होते. ‘सुधीर फडके चित्रपट गीत रजनीहा संगीतमय कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला होता या कार्यक्रमाचे 500 प्रयोग झाले होते

बाबुजी हे त्यांचे दैवत होते आणि राजाभाऊंचा मुलगा उदयकुमार उपाध्ये हा पण बाबुजींचा त्यांच्या गाण्याचा चाहता आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून फक्त बाबुजींची गाणी सादर केली होती. या कार्यक्रमांतून उदयकुमार उपाध्ये, मंगला केळकर, चारुशीला बेलसरे, पद्मजा फेणाणी, ज्योत्स्ना हर्डीकर, सीमा चंद्रगुप्त, मुकुंद भागवत, अपर्णा रामदास, विजया करमरकर हे सर्व गायक तर बालवयातील अलका कुबल, किशारी शहाणे यांचा कोरस, अनंतराव जोग यांचे संगीत संयोजन तर अनिल दिवेकर यांचे सूत्रसंचालन अशा मोठय़ा ताफ्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय देखणा होत होता. ‘अधीर आर्त घननीळ बरसती’, ‘निराकार सकल ओंकार’, ‘चंद्रकांती केतकी तू, ‘या शामल संध्याकाळीअशी अनेक गाणी लोकप्रिय झाली. राजाभाऊ उपाध्ये यांनी तरुणपणी सुरुवातीच्या काळात पं. राम मराठे, यशवंतबुवा जोशी, भरतेमास्तर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते, तर शाम कांबळी, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, राम कदम यांच्याबरोबर संगीतसाथ केली आहे.

राजाभाऊ उपाध्ये यांच्या पत्नीचे, मंगला यांचे दीड वर्षापूवीच निधन झाले  त्या 89 वर्षांच्या होत्या. त्या गोरेगावमधील एक नावाजलेली शाळामहाराष्ट्र विद्यालयया शाळेच्या संस्थापिका होत्या. मंगला उपाध्ये यांनी या शाळेची सुरुवात आपल्या मुलींबरोबरच्या दहा मुलांना घेऊन स्वतःच्या घरातच केली. अतिशय खडतर प्रवास करत आता ही शाळा टोलेजंग इमारतीत आणेपर्यंत मोठी करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या शाळेच्या संपूर्ण जडणघडणीमध्येही राजाभाऊंचा 1964 सालापासून आतापर्यंत सक्रिय सहभाग होता. तेथेही संस्थेमध्ये त्यांनी अध्यक्षस्थान भुषविले होते. संगीत आणि शिक्षण ही दोन्ही क्षेत्र राजाभाऊंच्या घरात नांदत होती. शिक्षणतज्ञ आणि संगीततज्ञ असे हे उभयता फक्त दीड वर्षाच्या अंतराने सर्वांना सोडून गेले. प्रचंड इच्छाशक्ती, उत्तम संगीतकार, आत्मविश्वासाचे बळ, तलख बुद्धी, भरपूर लोक संग्रह, देवावर नितांत श्रद्धा, थोडे कठोर, परंतु सर्व वयाच्या लोकांमध्ये रमणारे असे हे राजा उपाध्ये म्हणजेचआबा’. आज आपल्यात नसले तरी त्यांच्या गीतरचना आणि संगीत साधनेच्या रुपात ते आपल्यातच राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या