मुद्दा – नक्की काय बदललंय?

840
प्रातिनिधिक फोटो

>>> योगेश्री बापट-पावसकर

दर दोन-चार दिवसांनी बलात्काराची बातमी येते. हे आणि हेच चालत आलंय दशकानुदशकं. माणूस निर्घुण बनत चाललाय, समाज माध्यमांनी प्रलोभनांची दारं खुली केली आहेत. स्त्र्ायांच्या आधुनिक वस्त्रांमुळे पुरुषी नजरा चाळवतात अशी कारणे दिली जातात. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशात आजही स्त्री सुरक्षित नाही.

पण मग प्रश्न असा पडतो की, पूर्वी तरी स्त्राr सुरक्षित होती का? तेव्हा तर आतासारखी प्रलोभनेही नव्हती. मग किमान तेव्हा तरी स्त्राrने सुरक्षित असायला हवं होतं, पण तसं कधीच घडलं नाही. तेव्हाही नाही आणि त्याआधीही नाही. कारण परकीयांपेक्षा ती जास्त पिचली. म्हणूनच कदाचित बलात्कार ही संज्ञा मला फक्त शारीरिक वाटत नाही. ती त्याहीपेक्षा मानसिक अधिक वाटते. मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक गोष्ट ही बलात्कारच असते. म्हणूनच फक्त शारीरिक पातळीवर नाही तर मानसिक, भावनिक पातळीवर सतत तिच्यावर बलात्कारच होत आला पूर्वीपासून.

तिला शिक्षण नाकारलं ते तिच्याच घरच्यांनी. काचपाणी खेळण्याच्या वयात चूल फुंकायला लावली तिच्याच घरच्या बायांनी. स्वतःच्या शरीराबद्दलही जाण नसणाऱया बालवयात तिची लग्नं लावून टाकली गेली. मग काय रांधा, वाढा, बाळंतपणं आणि मनावर दगड ठेवून घालवलेल्या असंख्य रात्री. किती ते नाना प्रकारचे असंख्य अगणित बलात्कार. स्त्राrच्या संदर्भातली प्रत्येक गोष्ट इतरांनीच ठरवली. त्या इतरांमध्ये परके तर होतेच, पण तिचे आपलेही होते.

‘‘जे आणलंय ते पाच जणांत वाटून घ्या’’ असं म्हणून पांचालीच्या मनाविरुद्ध तिची वाटणी करणारी तिची सासूच होती. कौरवांनी तिचं वस्त्रहरण केलं हे नीच कृत्यच, पण काहीही गरज नसताना तिला पणाला लावणं हे धर्माचं कृत्य त्याहून हीन आहे. दुःशासनाला तिच्या निरीला हात घालण्याची हिंमतही भीमार्जुनांच्या मौनामुळेच झाली. जिच्यासाठी अख्खी लंकापुरी जाळली, तिच्या चारित्र्यावर जराही विश्वास ठेवावासा वाटला नाही रामाला? परक्याने तिचं अपहरण केलं आणि तिच्या हक्काच्या माणसाने तिला कायमचं रानात सोडून दिलं. दोन्ही राजस्त्रियांची विटंबना त्यांच्याच आपल्या माणसांनी अधिक केली.

काळ बदलला, विचारही थोडेफार बदलले. स्त्रिया बदलल्या, पुरुषही बदलले, पण त्यांची आपापसातली नाती, भावनांचे पदर, त्यांच्या मूलभूत वृत्ती, एकमेकांकडे बघण्याच्या दृष्टी खरंच बदलल्या का? बदलल्याच असतील तर किती प्रमाणात? कारण हे सगळं जर खरंच बदललं असतं तर त्याचं प्रतिबिंब आपल्या समाजात लख्खं दिसलं असतं. एक सुदृढ, सशक्त समाज आपल्याला पाहायला मिळाला असता. भररात्री झोपेत दचकून जाग आली नसती.

हे सारं बदलायला हवं असं मनापासून वाटतं. फार वाटतं की, आजही तो शिवरायांचा तो काळ यावा, ज्या काळात हाती लागलेली यवनीसुद्धा सन्मानाने स्वगृही पाठवली गेली. जात, धर्म फक्त एकच – मानवधर्म. शिवरायांच्या आदर्शांवर जगता आलं पाहिजे. माणसाकडे निव्वळ माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. हे बदल पार आतून घडले पाहिजेत. वरवरचे देखावे नको. आपण हे करू शकतो, त्यासाठी स्त्राrला स्त्राr म्हणून गौरवण्याचीही गरज नाही. गरज आहे तिच्या देहापलीकडे जाऊन फक्त आणि फक्त माणूस म्हणून तिला समजून घेण्याची. स्त्री-पुरुष भेद जेव्हा असे मुळापासून गळून पडतील तेव्हा एक निरोगी समाज तयार होईल.

आपली प्रतिक्रिया द्या