सेल्फ केअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःची काळजी घेणे म्हणजे सेल्फ केअर. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या व्याख्येनुसार सेल्फ केअर म्हणजे ‘आरोग्य कर्मचाऱयांच्या मदतीने किंवा मदतीशिवाय स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची, आजारांना प्रतिबंध करण्याची, आरोग्य राखण्याची आणि विकार व विकलांगतेशी जुळवून घेण्याची क्षमता.’ स्वतःची काळजी घेण्याला शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाचा आधार मिळाल्यास दैनंदिन आरोग्यविषयक उपाय उपयुक्त ठरू शकतात.

आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सेल्फ केअरला प्राधान्य दिले पाहिजे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी, डोकेदुखी आणि किरकोळ त्वचा प्रादुर्भावांचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक सेल्फ केअर उत्पादने मार्पेटमध्ये आहेत, अशी माहिती बायर कन्झ्युमर हेल्थच्या पंट्री डिव्हिजन हेडचे संदीप वर्मा यांनी दिली.

प्रतिबंधात्मक आरोग्यातही सेल्फ केअरची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संतुलित पोषण, व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन ही काही सेल्फ केअर तंत्रे आहेत. ही तंत्रे गंभीर आजारांना प्रतिबंध करू शकतात किंवा त्यांची सुरुवात लांबणीवर टाकू शकतात आणि व्यक्तीचे एपंदर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारू शकतात. हातांच्या स्वच्छतेसारख्या सेल्फ केअर पद्धती, डायरिया व श्वसनमार्गातील प्रादुर्भावासारख्या गंभीर अवस्थांपासून लहान मुलांचे संरक्षण करू शकतात हे स्पष्टपणे दिसून आले आहे. निरोगी आयुष्यात योगदान देणाऱया सेल्फ केअर उपचार पद्धतींबाबत ग्राहकांना, विशेषतः दुर्गम भागात राहणाऱया ग्राहकांना शिक्षित करणे अत्यावश्यक आहे.

डिजिटल आरोग्य उपायही रुग्णांना किरकोळ आजारांचे स्वयंव्यवस्थापन करण्यात उपयुक्त ठरू शकतात.