लेख : ठसा : शरद हजारे

1370

>> विकास काटदरे

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत विख्यात शास्त्राr संगीताच्या गायिका डॉ. सुचेता बिडकर यांचे निधन झाले आणि त्या पाठोपाठ जागतिक कीर्तीचे दिलरुबा वादक, भगवद्गीतेचे अभ्यासक शरद हजारे यांचे निधन झाले. संगीत क्षेत्रातील दोन तारे लुप्त झाले. तिरुवय्यार आश्रमाचे महायोगी रमण महर्षी यांचे हजारे शिष्य होते

महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गरवारे पेंटस्मध्ये काही काळ नोकरी केली. सुरुवातीला ते ठाण्यात वास्तव्याला होते नंतर गेली 40 वर्षे ते डोंबिवलीत राहत होते. मधूर वाणी, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, शांत स्वभाव असे ते होते. रमण महर्षींनी दिलेला अध्यात्माचा वारसा त्यांनी समृद्ध केला. त्यांचा जास्त कल अध्यात्माकडे असला तरी त्यांनी कला जोपासली. घरी ते सतार दिलरुबा वाजवण्याचे शिक्षण देत. त्यांच्या शिष्यवर्गात तेबाबाम्हणून ओळखले जात. गीतेवर त्यांनी सखोल चिंतन करून लेखन केले होते. ‘सखल संतनावाने त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेतवयाच्या 12 व्या वर्षी आकाशवाणीवर दिलरुबा वाजवून शाबासकी मिळवली होती

योगाचा अभ्यास करताना हार्मोनियम, सतार, सारंगी, व्हायोलिन दिलरुबा अशी वाद्ये ते वाजवीत. शास्त्राr संगीताचाही अभ्यास त्यांनी केला होता. घरात देवांच्या मूर्ती असल्या तरी ध्यान साधना सगुण निर्गुण यांचा मिलाप होता. रमण महर्षींनी दिलेला आध्यात्मिक विचारांचा वारसा त्यांनी समृद्ध केला. ‘गीतासारही इंग्रजीत पुस्तिका लिहिली. दिलरुबा या वाद्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे ते वादक होते. असा हा जागतिक कीर्तीचा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

आपली प्रतिक्रिया द्या