‘सोनई’ची भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>तुषार भोंग

 सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मास येऊन आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वात भरारी घेण्याचे काम सोनईचे चेअरमन दशरथ माने यांनी केले आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शून्यातून विश्व कसे निर्माण केले जाऊ शकते हे त्यांच्या रूपाने नव्या पिढीसमोर आदर्श उदाहरण आहे. सोनई ग्रुप हा कृषी धवल औद्योगिक क्रांतीचे प्रतीक असून शेतकऱयांना योग्य न्याय व शहरातील ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करत ‘सोनई’ देदीप्यमान वाटचाल करत आहे.

सन 2001मध्ये दूध उत्पादक शेतकऱयांच्या दुधाला दर कमी मिळत होता. अतिरिक्त दूध उत्पादनामुळे शेतकऱयांना खाडे दिले जात होते. तसेच दूध अनेकदा रस्त्यावर ओतून द्यावे लागत होते. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सोनई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने (दादा) यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत सोनई दूध प्रकल्पाची स्थापना केली. पहिल्या दिवशी फक्त 13 हजार लिटर दूध संकलन झाले. 40 हजार लिटर क्षमतेचा प्रोसेस प्लँट व पाऊच पॅकिंग अशा स्वरूपामध्ये प्रकल्पाची उभारणी करून लोकनेते शरद पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्या वेळी खासगी दूध संघ चालवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे तालुका संघ व जिल्हा संघ यांचा दुधाचा पुरवठा महानंदा डेअरीस केला जात होता. याउलट खासगी दुधाची विल्हेवाट लावण्याची कोणतीही सुविधा राज्यात उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत खासगी दूध संघ चालवणे शक्यच नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त डेअरी प्रोसेसिंग प्लांटची उभारणी व शेतकऱयांना योग्य मार्गदर्शन करून दुग्धव्यवसाय हा शेतकऱयांच्या उत्पन्नाचा आर्थिक कणा होऊ शकतो, हे ओळखून सोनईचे चेअरमन दशरथ माने (दादा) यांनी प्रभावीपणे वाटचाल सुरू केली.

दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी, अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य या काळात लाभले. दादांची प्रशंसनीय शिस्त, धाडसी निर्णय, अचूक नियोजन, प्रभावी अंमलबजावणी यांच्या माध्यमातून सोनाई डेअरी व शेतीपूरक संस्थांनी अल्पावधीतच नेत्रदीपक कामगिरी करण्यास सुरुवात केली. दादांची चिकाटी, मेहनत व या सर्वांना प्रामाणिकपणा, आदर्श व्यवहार यांची दिलेली जोड यातून निरनिराळे कीर्तिमान सोनई डेअरीच्या माध्यमातून उभे केले. जसे पैसे मिळतील त्या पद्धतीने दूध उत्पादकांना आर्थिक न्याय देऊन प्रकल्पाच्या विस्तारीकरणास सुरुवात झाली व आजपर्यंतच्या प्रत्येक दिवसापर्यंत बांधकाम व मशिनरीची उभारणी करून आज 35 लाख लिटर दूध हाताळणी क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे.

दादांनी सुरुवातीपासूनच शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱयांना योग्य न्याय देण्याचे धोरण अवलंबिले. त्या माध्यमातून सोनई डेअरी अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवण्याची किमया केली. सोनईमध्ये उत्पादित झालेली उत्पादने आज 25 देशांत निर्यात होतात. सोनई ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच 47 लाख दूध उत्पादक शेतकऱयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आर्थिक फायदा झालेला आहे. सोनईमधून उत्पादित होणाऱया उत्पादनांना देशभरात मागणी आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि उत्तर हिंदुस्थानातील चोखंदळ बाजारपेठेत सोनईच्या तुपाला सर्वाधिक मागणी आहे. मदर डेअरी, ब्रिटानिया, अमूल, पतंजली, गीट्स, श्रीश्री आयुर्वेदा अशा अनेक नामांकित आंतराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने सोनईमध्ये उत्पादित होतात. सोनईकडे आंतराष्ट्रीय दर्जाचा प्रोसेसिंग प्लांट असून उच्च दर्जाची उत्पादने सोनईमधून उत्पादित केली जातात व देशभरात वितरीत केली जातात. शेतकऱयांद्वारे दूध संकलित करण्याकरिता 200 बल्क मिल्क कुलर व 80 चिलिंग सेंटर यांची उभारणी पुणे, सोलापूर, नगर, धाराशीव, सांगली, सातारा या जिल्हय़ांमध्ये करण्यात आली आहे.

सोनई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने (दादा) यांनी सोनई डेअरीबरोबरच सोनाई वाहतूक संस्था, सोनई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सोनई कॅटल फिड अशा शेतीपुरक संस्थांची उभारणी केली. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱयांना पतसंस्थेमार्फत कर्ज पुरवठा, अन्न-धान्य पुरवठा, पेट्रोल पंपाच्या माध्यमातून डिझेल व पेट्रोल पुरवठा व पशुखाद्य प्रकल्पातून दर्जेदार पशुखाद्य आदी सुविधा पुरविल्या जातात. देशातील दुग्धक्रांतीत सोनई डेअरी अग्रक्रमाची भूमिका बजावत आहे.

हे सर्व करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सोनई परिवार अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतो. यात रामदेव बाबा यांचे पाच दिवसाचे योग शिबीर, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेले विविध कोर्सेस, रक्तदान शिबिरे, दुष्काळग्रस्त शेतकऱयांना केलेली मदत, होतकरू तरुणांना शिक्षणासाठी करण्यात येणारी मदत, अपंगांना साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे अशा एक ना अनेक कामांचा उल्लेख करता येईल.

सोनई डेअरीमध्ये 18 लाख लिटर फ्रेश दूध डायरेक्ट शेतकऱयांकडून खरेदी करून ते पुन्हा दूध व विविध उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. सोनई डेअरीमध्ये तूप, दही, ताक, लस्सी, पेढा, सहा महिने टिकवन क्षमता असणारे पनीर, श्रीखंड, आम्रखंड या पारंपरिक उत्पादनांबरोबर बटर, प्रोसेस चीज, चीज क्युब, चीज स्लाईस, चीज ब्लॉक, मोजरेला चीज, स्कीम्ड मिल्क पावडर, होळ मिल्क पावडर, डेअरी व्हाईटनर, व्हेपावडर, फळेबर मिल्क, स्वीट ऍण्ड कंडेन्स मिल्क, तसेच यू.एच.टी. ट्रीटमेंटद्वारे तयार होणारे टेट्रा पॅकिंग असणारे दूध इत्यादी उत्पादने उत्पादित होतात व 200 प्रकारच्या विवध प्रकारच्या पॅकमध्ये पॅकिंग केली जातात. तसेच या उत्पादनांच्या विक्रीकरिता डेअरी मार्ट या संकल्पनेद्वारे 200पेक्षा जास्त स्टोअर्स महाराष्ट्रातील मेट्रो सिटीजमध्ये सुरू करण्यात आली आहेत. सोनई डेअरी ही दुधापासून सर्वात जास्त पदार्थ बनविणारी खाजगी क्षेत्रातील देशामधील सर्वात मोठी कंपनी आहे.

दशरथदादा माने, चेअरमन सोनई उद्योग समूह