विज्ञान हाच श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

जैवरसायनशास्त्रज्ञ डॉ. वेंकी रामकृष्णन. भरपूर अभ्यास, भरपूर पदव्या… पद्मविभूषण पुरस्कार… पण या साऱया गोष्टीत अत्यंत वरचढ राहिला विज्ञानाचा ध्यास व त्याचा मायदेशात प्रसार.

रॉयल सोसायटी, लंडनचे 62वे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. व्यंकटरामन रामकृष्णन यांनी सांगितले, ‘‘मला विज्ञानासाठी सरकारकडून अधिक पाठबळ मिळवायचंय. त्याचबरोबर लोकांमध्ये त्याबद्दलची जाणीव अधिक वाढवून विज्ञानातील रुची वृद्धिंगत करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर संस्थांबरोबर काम करत विज्ञान शिक्षणाचा दर्जा विशेषतः शालेय विज्ञान शिक्षणाचा दर्जा सुधारण्याला माझं प्राधान्य असणार आहे.’’ इतरही तीन-चार मुद्दे त्यावेळी त्यांनी मांडले. त्यापैकी महत्त्वाच्या दोन मुद्दय़ांचा संदर्भ त्यांच्या प्रत्येक वेळी हिंदुस्थान भेटीच्या प्राधान्यक्रमात होताच. रॉयल सोसायटी लंडनद्वारे निवडण्यात आलेले या वर्षीचे फेलोज (सन्माननीय सभासद) मध्ये पाच हिंदुस्थानी वा मूळ हिंदुस्थानी शास्त्रज्ञ आहेत.

परंतु रॉयल सोसायटी लंडनचे अध्यक्ष एवढीच प्रा.वेंकी रामकृष्णन यांची ओळख नाही. 1952 साली तामीळनाडूत चिदंबर मला जन्मलेल्या प्रा. वेंकी रामकृष्णन यांचे पालक वैज्ञानिक होते. त्यांचं शिक्षण प्रामुख्यानं गुजरातीत झाले. त्यांच्या करीअरमध्ये बरेच बदल झाले. मूळ भौतिकशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या प्रा. वेंकी रामकृष्णन यांनी जीवशास्त्रात संशोधन करीअर केलयं. त्यांना रायबोसोम्सविषयी, कार्याविषयी 2009 सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. ते म्हणतात, ‘‘माझा सुरुवातीचा निर्णय आकस्मिक आणि अपघाती होता. मला जेव्हा जीवशास्त्राकडे वळायचे होते तेव्हा मी पुन्हा ग्रॅज्युएट स्कूलमध्ये जाण्याचं ठरवलं. त्यावेळी एक लेख माझ्या वाचनात आला. तो रायबोसोम्सची रचना अभ्यासण्यासाठी असलेल्या एका भौतिकशास्त्र्ााrय तंत्राविषयी होता. मला त्यावेळी वाटले की, आपण जीवशास्त्राविषयी पुरेसं ज्ञान मिळवलंय म्हणून मी डॉनना फोन केला. तेव्हा त्यांनी मला पीटरकडे ‘पोस्ट डॉक’ म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मग मी रायबोसोम्सविषयक काम करण्याकडे वळलो.’’ प्रा. वेंकी रामकृष्णन यांनी नंतर पुढे याच अत्यंत आव्हानात्मक प्रश्नावर दीर्घकाळ चिकाटीने काम केले आणि रायबोसोम्सकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन विकसित केला. ते म्हणाले, ‘‘मी त्यासाठी क्रिस्टलोग्राफीकडे वळलो. मी ते शास्त्र शिकलो. मी त्यावेळी 40 वर्षांचा होतो. मग मी क्रिस्टलोग्राफीचा वापर करून रायबोसोमकडे बघू लागलो आणि मग त्यात सातत्य राखून रायबोसोम्सविषयी चिकाटीने, पण वेगवेगळय़ा ऍप्रोचने काम करत राहिलो. 40व्या वर्षी क्रिस्टलोग्राफी शिकणं म्हणजे खरोखरच एक कठीण कामच म्हणायला हवे असे म्हणतात. त्यांनी आपल्या शांत संयत पद्धतीने याविषयीची तपशीलवार मांडणी केली. ती जागेअभावी या ठिकाणी लिहिणे शक्य नसलं तरी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो वैज्ञानिकांनी सॅबॅटिकल (साधारण एक वर्षाची रजा) घेण्याचा. त्यांच्या मते ‘‘सॅबॅटिकल हा कोणत्याही व्यत्ययाशिवाय एखादी नवी गोष्ट शिकण्यासाठी महत्त्वाचा काळ असतो. कारण त्यावेळी इतर कोणतंही काम नसतं. नेमकं हेच क्रिस्टलोग्राफी शिकण्याच्या बाबतीत घडलं. तुमच्या संशोधनासाठी महत्त्वाचे काय ते समजून घेऊन शिकल्यास संशोधनात प्रगती वेगाने होते.’’

वडोदऱयाहून सुरुवात केल्यानंतर ओहायो ते सॅनदिएगो, योज बुकहॅवेन, उटाह आणि सरतेशेवटी ब्रिटन असा त्यांचा प्रवास आहे. ते अमेरिका आणि ब्रिटनचे नागरिक आहेत. परंतु हिंदुस्थानामधील वैज्ञानिक परिस्थितीविषयी ते कमालीचे संवेदनशील असून आपली मते आग्रहीपणे व्यक्त करण्यास कचरत नाहीत. एमआरसी लॅबोरेटरी ऑफ मॉल्युक्यूलर बायॉलॉजी केंब्रीजच्या स्ट्रक्चरल स्टडीज विभागाचे ते प्रमुख असून हिंदुस्थानातील बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे ते व्हिजिटिंग प्राध्यापक आहेत. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझी हिंदुस्थानबरोबर नाळ वैयक्तिक स्तरावर जोडलेली आहे. मी या संस्थेला भेट देणे सुरू केले, कारण तिथल्या एका शास्त्रज्ञाविषयी मला खूप आदर असून ते मला आवडतात. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुस्थानाशी माझा संबंध आला. नंतर मी तिथले तरुण शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांशी माझ्या व्याख्यानांच्या अनुषंगाने जोडला गेलो. मी इतरही संस्थांना भेटी देतो, परंतु आयआयएएस इतक्या वारंवार नाही.’’

हिंदुस्थान आणि चीनच्या संशोधन परिप्रेक्षात खूपच तफावत आढळून येते. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘गुंतवणुकीमध्ये फरक असल्यास काय होतं याचे उदाहरण म्हणजे चीन आणि हिंदुस्थान. चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूकही करण्यात आलीय. मी जेव्हा चीनला जातो तेव्हा मला जाणवतं की, त्या देशाने काही बाबतीत पाश्चिमात्य देशांशी बरोबरी साधली आहे. अगदी सर्वोत्तमांशी नाही तरी निदान चांगल्यांशी तरी. हे काही एलिट संस्था वगळता हिंदुस्थानात घडलेलं नाही. 2010 साली ‘पद्मविभूषण’ हा द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च हिंदुस्थानी नागरी पुरस्कारप्राप्त प्रा. वेंकी रामकृष्णन यांची बीएस्सी पदवी महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा येथील आहे. ‘‘जीन मशीन’’ नावाचं त्यांचं एक पुस्तक 2018 साली प्रकाशित झालंय ते बेस्ट सेलर मानले जातंय. असे हे एक प्रांजळ, सोज्वळ, शांतपणे व्यक्त होणारं कणखर शास्त्रज्ञाचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी आदर्श म्हणायला हवं.