ठसा – विनोदाचा गहिरा रंग

2635

सरदार, मैने आपका नमक खाया है सरदार!’ हा त्यांचा ‘शोले’मधील प्रचंड गाजलेला डायलॉग. या डायलॉगची नंतर पारायणे झालीच, परंतु हा ‘कालिया’ही प्रत्येक रसिकाच्या मनात ठसला तो कायमचा. या चित्रपटाला चार दशकं उलटून गेली असली तरी या संकादाची आणि त्याबरोबर विजू खोटे यांची आठवण काढली जातेच.  बॉलीवूडचे विनोदी जग अजूनही या डायलॉगभोवती फिरतेय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ही भूमिका म्हणजे त्यांच्या हटके शैलीचं एक उदाहरण होतं. त्या त्या पात्राला अभिनयाचा गहिरा रंग देताना तो भविष्यात कधीच पुसला जाणार नाही यासाठी ते कायम आग्रही राहिले, हेच यातून लक्षात येतं. ‘शोले’तील गब्बर आणि ‘कालिया’तील जुगलबंदीबरोबरच त्यांची ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील रॉबर्टची भूमिकाही गाजली. किनोदाचे अचूक टायमिंग साधणारे कलाकार म्हणून विजू खोटे प्रसिद्ध होते. त्यांच्या अभिनयाची ही जादू मराठीतही पाहायला मिळाली. ‘अशी ही बनका बनकी’ या मराठी चित्रपटात अतिशय छोटी भूमिका असूनही ती भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. विजू खोटे यांच्या भूमिका आघाडीच्या नसल्या तरी त्या वैशिष्टय़पूर्ण आणि महत्त्वाच्या होत्या. यामुळेच अभिनयक्षेत्रात सुरुवातीला नायकाची भूमिका केल्यानंतरही ते इतर भूमिकांकडे वळले आणि या भूमिकांवर स्वतःचा ठसा उमटवला. किजू खोटे यांनी 300 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांच्या असंख्य छोटय़ा भूमिका त्यांचे अभिनय कौशल्य आणि संकादफेक अप्रतिम असल्याने दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. विजू खोटे यांच्या विनोदी भूमिकांबरोबरच खलनायकी भूमिकाही गाजल्या. मराठी-हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक कर्षे नाटकांमध्येदेखील काम केले होते. छोटय़ा पडद्याकरील मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप टाकली होती. ‘जबान संभाल के’ या मालिकेतील त्यांनी साकारलेली क्यक्तिरेखा रसिकांच्या स्मरणात आहे. ‘या मालक’ या 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करीयरला सुरुकात केली. गेल्या 55 कर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. विजू खोटे यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. किजू खोटे यांचे कडील नंदू खोटे यांनी अनेक मूक चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘जाने क्यूं दें यारो’ हा विजू खोटे यांचा विनोदी भूमिका असलेला शेवटचा चित्रपट. अनेक कर्षे चित्रपटसृष्टीमध्ये राहून अनेक स्टार कलाकारांसह काम करूनही किजू खोटे अत्यंत साधे, सालस होते. कागणं-बोलणं अतिशय छान असणाऱ्या या कलाकारामुळे शूटिंगच्या सेटकरचं वातावरण मराठमोळं होऊन जात असे.  ‘इतक्या भूमिका केल्या, पण शोलेतल्या कालियाने मला ओळख मिळकून दिली’ अशी कबुली ते हसत हसत द्यायचे. त्यांनी अनेक हिंग्लिश नाटकांमधूनही काम केले. विजू खोटे हसतमुख चेहरा आणि प्रेमळ स्वभावाने सेटवरच्या साऱयांचं परिचित असायचे. विजू खोटे उभरत्या कलाकारांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असायचे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीत नव्याने पाऊल ठेवणाऱ्या मराठी कलाकारांना  प्रोत्साहन, धीर देण्यासाठी ते पुढे असत. केवळ शाब्दिक धीर देऊन ते थांबत नसत तर प्रसंगी हवी ती मदत देण्यास ते तत्पर असत. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्या चतुरस्त्र्ा अभिनयाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनयाच्या निधनाने आपण एक खरोखरच हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे.

> >शुभांगी बागडे

आपली प्रतिक्रिया द्या