
स्वतःला अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणवून घेणाऱया पाकिस्तानमध्ये प्रत्यक्षात ‘अन्नवस्त्रा’ची मारामार आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था कशी डबघाईला आलीय, तिथले नेते रोज उठून वर्ल्ड बँक आणि आयएमएफकडे कशा याचना करतात, याबाबतच्या बातम्या आपण सातत्याने ऐकत असतो. पाकिस्तानची हीच स्थिती दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तानी नागरिकानेच तो इन्स्टावर शेअर केला आहे. पाकिस्तानच्या अवामी एक्स्प्रेसचा हा व्हिडीओ आहे. ही ट्रेन अत्यंत जीर्णशीर्ण अवस्थेत असून जीव धोक्यात घालून लोक प्रवास करत आहेत. त्यामुळे अण्वस्त्र की अन्नवस्त्र याचा विचार करण्याची वेळ पाकवर आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा व्हिडीओ https://shorturl.at/jvqJP या लिंकवर पाहता येईल.