
>> महेश कोळी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विश्वाला एका नव्या युगात घेऊन जात आहे. टेक्नॉलॉजीच्या विश्वात मेटावर्ससारख्या आभासी जगाच्या आगमनाने जनरेटिव्ह एआयचा आणखी विस्तार होणार आहे. मानवाप्रमाणे विचार करण्याची क्षमता आणि तद्वत अचूक प्रतिक्रियाशीलता (अॅक्युरिटिव्ह रिऑक्टिव्ह) यामुळे जगापुढे काही धोके उद्भवू शकतात. अलीकडेच तंत्रज्ञानाच्या विश्वातील जगप्रसिद्ध तज्ञांनी याबाबत एक खुले पत्र लिहिले असून एआयच्या क्षेत्रावर नियमनाची मागणी केली आहे. जगभरातील अनेक संशोधक, वैज्ञानिक आणि उद्योजक या सर्वांनी मिळून खुले पत्र लिहून अशा प्रकारची मागणी करण्याची गरज का भासली?
गेल्या आठवड्यात अनेक मोठय़ा बातम्या माध्यमात चर्चिल्या जात असताना एका बातमीला तुलनेने कमी महत्त्व दिले गेले. ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधानांनी ट्विट केले. “सर्वसमावेशक चर्चेसाठी सॅम अल्टमन यांचे आभार. डिजिटल बदलाला वेग देऊन नागरिकांचे सक्षमीकरण करणाऱया सर्व सहकाऱयांचे स्वागत करता.s’’ या भेटीची फारशी मोठी चर्चा झाली नसली तरी एआयवर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात जपानमध्ये जी-7 बैठकीत याच मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. त्याच काळात ‘ओपन एआय’ने ‘आयओएस’साठी ‘चॅट जीपीटी अॅप’ लाँच केला. तेव्हापासूनच चर्चेला वेग आला. चॅट जीपीटी हे विकसित नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मॉडेल आहे. यासंदर्भातील पहिला संशोधन अहवाल 2018 मध्ये एका मासिकेत प्रकाशित करण्यात आला. त्याला आपण गुगलप्रमाणे टूल म्हणून गृहित धरू शकता. तो आपल्या प्रश्नाचे बिनचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मात्र हेच तंत्रज्ञान आता मनुष्यजातीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असेही म्हटले जात आहे. या संभाव्य धोक्यावरून अनेक दिग्गज तज्ञांनी सरकारला एक खुले पत्र लिहिले असून त्यात एआयसाठी नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे.
ओपन एआय
आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय)शी संबंधित असणारी संशोधन प्रयोगशाळा ओपन एआय आयएनसी ही एक स्वयंसेवी संस्था आहे. त्याची स्थापना 2015 रोजी सॅम अल्टमन, एलन मस्क आणि अन्य मंडळींनी सॅन फ्रान्सिस्को येथे केली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये मस्कने या मंडळाचा राजीनामा दिला आणि ते देणगीदार म्हणून या संस्थेशी संलग्न राहिले. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि मॅथ्यू ब्राऊन कंपनीने त्यात गुंतवणूक केली. याच वर्षी मायक्रोसॉफ्टने यात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. आयआयटी दिल्लीत ‘डिजिटल इंडिया डायलॉग’मध्ये अल्टमन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा सकारात्मक राहिली. पंतप्रधान मोदी हे एआयवरून उत्सुक आहेत. त्यांनी या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱया संभाव्य धोक्यावरही चर्चा केल्याची माहिती अल्टमन यांनी दिली.
कोणता धोका?
मशीन जेव्हा माणसाची जागा घेईल आणि त्याचा विस्तार होईल तेव्हा एक ना एक दिवस ती गेष्ट त्याच्या मुळावर येईल, असे भाकित संगणक युगाच्या प्रारंभीच करण्यात आले होते. आता तज्ञ मंडळी खुलेपणाने ही गोष्ट मांडत आहेत. आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या शस्त्राप्रमाणे त्याचा वापर होऊ शकतो. उदा. ड्रग डिस्कव्हरी टूल्सच्या मदतीने रासायनिक शस्त्रे तयार करता येऊ शकतात. खोट्या बातम्या, माहिती या गेष्टी समाजात अस्थिरता निर्माण करू शकतात. त्याचा लोकशाही व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे एआयची शक्ती ही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रित होण्याचा देखील धोका आहे. सरकारकडून या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांवर देखरेख करणे आणि दडपशाही धोरण राबविणे यासारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. मनुष्यप्राणी हा एआयवर अवलंबून राहून आळशी होऊ शकतो आणि मशीनच्या माध्यमातून अमरत्वाचा शोध घेतला जाईल. जसे पिक्सेल चित्रपट ‘वॉल ई’सारख्या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. अर्थात अशा सर्वनाशाच्या कल्पना बऱयाचदा वाढवून सांगितल्या जात असल्याचेही काही एआय तज्ञ म्हणत आहेत.
पुढच्या पिढीचा विकास
या वर्षी मार्च महिन्यात एलन मस्क आणि काही तज्ञांनी एक खुले पत्र लिहिले असून त्यात या एआयच्या नेक्स्ट जनरेशनचा विकास थांबविण्याची शिफारस केली आहे. या पत्रात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. माणसाला मागे टाकणारा बिगरमानवी मेंदू तयार करण्याची खरंच गरज आहे का, जो आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट असेल, आपली जागा घेईल? या प्रश्नाचे उत्तर आताच देता येणार नाही, पण ओपन एआय, गुगल डीप माइंड, अंथ्रॉपिक आणि अन्य एआय प्रयोगशाळेत यासंदर्भात इशारे दिले आहेत. हा धोका एखाद्या महासाथीप्रमाणे, यादवी युद्धाप्रमाणे राहू शकतो. या तीन संस्थांच्या 350 हून अधिक अधिकाऱयांनी खुल्या पत्रात म्हटले की, सुपरइंटेलिजन्सला ‘आण्विक ऊर्जा’प्रमाणे नियंत्रित करायला हवे.
रचनात्मक परिमाण
मशीन आता माणसारखे काम करत आहे. आपण संगीताची धून तयार करत असाल तर ती दोषविरहित असेल. त्यानुसार रचनात्मकतेचे नवीन परिमाण खुले होत आहे. पिकासोच्या रॅम्ब्रा शैलीत एखादे चित्र तयार करण्याची इच्छा असेल तर आर्टिफिशियल इंटिलिजन्स हे काम पूर्ण करेल. कारण त्याच्याकडे या शैलीशी संबंधित एक लहानसे विवरण उपलब्ध आहे. तो त्याच माहितीच्या आधारे चित्र तयार करेल. क्वांटम कॉम्प्युटिंगचा काळदेखील येत आहे. वेगाचे बंधन राहणार नाही. प्रत्येक प्रकारचे डेटा अॅनालिसीस आणि व्रेकेट, हॉकी आणि फुटबॉलसारख्या खेळासंबंधित सॉफ्टवेअरमध्ये एआयचा वापर केला जात आहे. एअर ट्रफिक आणि नेव्हिगेशन तसेच संरक्षण उद्योगात क्षेपणास्त्र, सेन्सर, रडारला हे तंत्रज्ञान जोडले गेले आहे. अशा स्थितीत युद्धनौकेची तयारी केली जात असून ती स्वसंरक्षणासाठी सुसज्ज राहू शकते.
आता नियमांची गरज
आता एआयसाठी नियमावली तयार करण्याच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. एकीकडे त्याच्या दुरुपयोगाची भीती आहे, तर दुसरीकडे व्यक्त केला जाणारा धोका म्हणजे जगभरातील सरकार या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करू शकतात. विशेष म्हणजे या क्रमवारीत बहुतांश संशोधन खासगी क्षेत्रातच झाले आहे. इंटरनेटची संपूर्ण व्यवस्था खासगी व्यवस्थेच्या हाती आहे. या गोष्टीतून आणखी एक धोका निर्माण होऊ लागला आहे. तो म्हणजे जग हे ठरावीक कंपन्यांच्या हातातच एकवटले जात आहे. अलीकडेच पेंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एआयबाबतीत लवकरच नियम आणले जातील, असे सांगितले. डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल याचीही माहिती त्यांनी दिली. इंटरनेटला ओपन, सेफ आणि डिजिटल नागरिक म्हणून सुरक्षित राहण्यासाठी कायदेशीर रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जगात हिंदुस्थान सर्वाधिक कनेक्टेड देश असून आपल्याला हिंदुस्थान सर्वाधिक सुरक्षित आणि विश्वसनीय देश म्हणून ओळख निर्माण करायची आहे. सरकारने 2019मध्ये विधेयक मांडले. मात्र ते विधेयक माघारी घेण्यात आले. आता त्या विधेयकात गरजेनुसार बदल करत पुन्हा आणले जात आहे. त्यांनी म्हटले की, इंटरनेटच्या माध्यमातून कलह निर्माण करणाऱया गोष्टी आणि गुन्हेगारीविषयक घडामोडी वाढल्या आहेत. डॉकिंग (चुकीच्या उद्देशाने आणि कोणाचीही परवानगी न घेता इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती पोस्ट करणे) यासारख्या गुह्याचे प्रमाण वाढले आहे. एआयच्या काळात हे धोके आणखीच वाढतील.
(लेखक संगणक अभियंता आहेत)























































