
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आल्यापासून माहिती तंत्रज्ञान आणि टेक कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत मोठे संरचनात्मक बदल केलेले दिसून येत आहेत. कार्यक्षमता वाढवणे व खर्च कपात करणे, या उद्देशाने अनेक कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टीसीएस, एक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि विप्रो यांसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांची नावे आहेत. यामुळे पुणे आणि बंगळुरूसारख्या आयटी हबमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अनेक कंपन्यांचा एआयवर भर –
- टीसीएस ः हिंदुस्थानातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विप्रो आणि एचसीएल टेक ः विप्रो कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नसली तरी कंपनीने 24,516 नोकऱ्या कमी केल्याचे समजते. एचसीएल टेकनेदेखील पुनर्रचना आणि गुंतवणुकीतील बदलांमुळे 2024 मध्ये सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
जागतिक कंपन्या
- एक्सेंचर ः जागतिक स्तरावरील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एक्सेंचरने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे.
- गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ः गुगलने डिझाइन विभागातील 100 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मायक्रोसॉफ्टनेही सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगसह संपूर्ण संस्थेमध्ये सुमारे 6 हजार नोकरकपातीची घोषणा केली.
- सेल्सफोर्स ः अमेरिकेतील क्लाऊड कंपनी सेल्सफोर्सने त्यांच्या कस्टमर सपोट विभागातून 4 हजार कर्मचारी कमी केले आहेत. कॉग्निझंटने 3,500 कर्मचारी, तर आयबीएम इंडियानेदेखील
1 हजार नोकरीची पदे कमी केली आहेत.