नाद मराठी – शोधिसी मानवा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

1980 या वर्षाचा जुलै महिना संपता संपता हिंदी सिनेसृष्टीवर वज्राघात झाला. सर्वसामान्य रसिक कमालीचे हळहळले. त्यांचा अत्यंत आवडता स्वर आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेला. त्या वर्षी 31 जुलैला ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक महंमद रफी वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी हे जग सोडून गेले. रफी, मुकेश, किशोर या एकेकाळी चार-पाच दशपं स्वरांकित करणाऱया महान गायकांना अल्पायुष्याचा शाप का मिळावा हे नियतीचं कोडंच… पण तसं घडलं खरं आणि मागे राहिला तो एक पहाडी सुस्वर, ज्याचं नाव होतं महंमद रफी. आजही रफीसाहेबांचे त्या काळातले चाहते जगभर आहेतच, पण नव्या पिढय़ांच्या ‘संगीत स्पर्धां’मध्येही रफीची गाणी तरुण मुलं आवर्जून गाताना दिसतात. लताच्या स्वरांची जादू जशी अमर आहे तशीच रफींच्याही. आज त्यांच्याबद्दलच थोडंसं. येत्या 31 तारखेला त्यांना जाऊन 43 वर्षे होतील तरी त्यांची स्मृती ताजी आहे. त्यांच्या गाण्यांमधून ते रोज कुठे ना कुठे प्रकट होताना कानी येतात.

24 डिसेंबर 1924 ते 31 जुलै 1980 एवढंच आयुष्य रफीसाहेबांना मिळालं. ‘फरफेक्ट जंटलमन’ असं ज्यांचं रास्त वर्णन केलं गेलं ते रफी नम्र स्वभावाचे सज्जन गृहस्थ होते. त्यांना प्रत्यक्ष गाताना पाहिलं तर एवढे विविध स्वराविष्कार शांत, संयमी मुद्रा ठेवून ते कसे प्रकट करतात याचं आश्चर्य वाटायचं. आज यू-टय़ूबवर त्यांच्या मैफलींच्या काही चित्रफिती उपलब्ध आहेत त्या पहा म्हणजे लक्षात येईल. हिंदी सिनेसृष्टीवर तीन दशपं अधिराज्य गाजवणाऱया या गायकाला सहावेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळालं. सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन सन्मान केला.

त्या काळच्या अखंड हिंदुस्थानात लाहोर येथे जन्मलेल्या रफी यांचं कुटुंब मुंबईला आलं आणि त्यांच्या भाग्याची द्वारं उघडली, परंतु शाळकरी वयातच तेराव्या वर्षी त्यांच्या गाण्यांनी लाहोर गाजवलं होतं. उर्दू आणि पंजाबी गाणी त्यावेळी हा मुलगा गात असे. गोड गळा आणि संगीताची ओढ लक्षात घेऊन उस्ताद अब्दुल वाजीद खान आणि पंडित जीवनलाल सद्दू यांच्याकडे त्यांनी शास्त्र्ााrय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं. 1931 मध्ये ‘बोलका’ झालेला पडदा आता नवनव्या गायकांची मागणी करू लागला होता. मात्र तोपर्यंत ‘प्लेबॅक’ पिंवा ‘पार्श्वगायन’ हा प्रकार नसल्याने नट-नटय़ा स्वतःची गाणी स्वतःच गात असत. नूरजहाँ, सुरैया, पुंदनलाल सैगल ही त्या काळातली हिंदी पडदा गाजवणारी नावं. रफींनी हिंदीत येण्यापूर्वी पंजाबी चित्रपटात झीनत बेगमसह द्वंद्वगीत गायिलं होतं. 1945मध्ये ‘गाव की छोरी’ या चित्रपटातून ते हिंदी प्रेक्षकांसमोर आले. महंमद रफी यांचा स्वर अगदी पहिल्यांदा उमटला तो पुंदनलाल सैगल यांच्या ‘रुही रुही रुही, मेरे सपनों की रानी’ या गाण्यात. त्यातल्या शेवटच्या दोन ओळी रफीच्या वाटय़ाला आल्या होत्या. रफी यांनी ज्या मराठी गायकासोबत नंतरच्या काळात एक द्वंद्वगीत गायिलं ते होते गंधर्व पंपनीतले नट कृष्णराव चोणकर. ‘बांट चलत नयी चुनरी रंग डारी’ हे ते गाणं. मिळालं तर जरूर ऐका.

1944 मध्ये मुंबईत आल्यापासून महंमद रफी यांची कारकीर्द बहरली ती अखेरपर्यंत बहरतच गेली. त्यांची किती किती हिंदी गाणी आठवावी! ‘मन तरपत हरी दरशन को – आज’, ‘चौदहवी का चांद हो’, ‘एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल’, ‘तारीफ करूं क्या उसकी’, ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’… पडद्यावर विविध भावना व्यक्त करणाऱया नायकांना त्यांचा योग्य स्वर लाभत गेला. ‘जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात’मधला भारतभूषण असो, ‘जंगली’तला ‘या।़हू’ करणारा शम्मी कपूर असो पिंवा अमर अकबर अॅन्थनी’मधलं ‘परदा है परदा’ हे ऋषी कपूरसाठीचं गीत असो, रफी सर्वत्र ‘छा गये!’

मराठीत रफीसाहेबांना आणण्याचं अद्वितीय कार्य संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी केलं. त्यांच्या सुमधुर संगीताने नटलेली, वंदना विटणकर, उमाकांत काणेकर यांची कितीतरी गाणी श्रीकांतजींनी रफीसाहेबांकडून ‘तयार’ करून घेतली. कारण पंजाबी, हिंदी, उर्दूची सवय असलेल्या रफींना ‘ळ’ आणि ‘ण’चा उच्चार शिकवणं सोपं नव्हतं. ते श्रीकांत ठाकरे यांनी यशस्वीरीत्या केलं आणि किती सुश्राव्य गीतं जन्माला आली पहा. ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी’ (वंदना विटणकर), ‘अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको’ (विनायक राहतेकर), ‘प्रभू रे खेळ तुझा न्यारा’ आणि ‘तुझे रूप सखी गुलजार असे’, ‘रे मना आज कोणी बघ तुला साद घाली’ (विटणकर) ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. उमाकांत काणेकर यांची ‘नको भव्य वाडा, नको गाडीघोडा’, ‘प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता’, ‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा’ ही गाणी आठवा.

मुंबईतच कार्यकर्तृत्वाची उंची गाठणाऱया रफींचा आवाज मराठीसाठी वापरावा असं त्या काळात हिंदी सिनेसंगीत क्षेत्र गाजवणाऱया अनेक मराठी दिग्गज संगीतकारांना कसं वाटलं नाही हे एक आश्चर्यच. तीच गोष्ट मुकेश आणि किशोर कुमारबाबतही घडली. श्रीकांत ठाकरे यांनी मात्र रफीसाहेबांच्या बाबतीमधली ही उणीव भरून काढली आणि त्यांना मराठीत ‘गातं’ करून मराठी रसिकांना कायमचं ऋणी केलं यात शंकाच नाही. एक अमर स्वर मराठीला लाभला. ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’ या वंदना विटणकरांच्या गीत स्वराबद्दल जे म्हटलंय तसं दिवंगत रफींविषयी म्हणता येईल – ‘नांदतो स्वर हा आपुल्या अंतरी’!