मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन 

2226

शुद्धलेखन ठेवा खिशात, या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे नाशिक येथे निधन झाले. गुरुवारी सकाळी 10 वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या 60 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे. अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या