उमेदवारीसाठी केजरीवालांनी 10 ते 20 कोटी मागितले, आपच्या नेत्याचा आरोप

706

दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत आपकडून उमेदवारी अर्ज मिळविण्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये मागितल्याचा आरोप आपचे माजी नेते आदर्श शास्त्री यांनी केला आहे. आपकडून तिकीट न मिळाल्यानंतर शास्त्री यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आदर्श शास्त्री हे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आहेत.

आदर्श शास्त्री यांनी शनिवारी आप पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना द्वारका मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी आप सोडण्याचा निर्णय घेतला. आपने या मतदारसंघातून विनय मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या