
गोव्यात तुम्ही तृणमूल काँग्रेसला खूपच महत्त्व देत आहात, पण ते शर्यतीत कुठेच नाहीत, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीएमसीला लगावला. गोव्यात आज केजरीवाल यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी तृणमूल काँग्रेसबाबत विचारले असता त्यांना तुम्ही टीएमसीला खूप महत्त्व देऊ नका. ते येथे तीन महिन्यांपूर्वी आलेत असेही स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेस आणि गोव्याचा काहीएक जुना संबंध नाही. त्याच्याकडे सध्या एक टक्काही मते नाहीत. कोणी कधीही येऊन निवडणूक लढवावी असे लोकशाहीत चालत नाही. तुम्हाला लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे करावी लागतात, असेही केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, 40 सदस्यांच्या विधासभेसाठी गोव्यात लवकरच निवडणूक होणार आहे.



























































