रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे निधन, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामानंद सागर यांच्या रामायण या गाजलेल्या मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्रिवेदी हे उत्तम कलाकार तर होतेच शिवाय ते समाजाबद्दल आत्मीयता असलेले व्यक्तिमत्व होते असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्रिवेदी यांच्याप्रमाणेच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नटू काकांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांनाही श्रद्धांजली वाहिली आहे. दोन्ही दिवंगत अभिनेत्यांसोबत आपले फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.