बाथरुममध्ये खेचून नेत नवऱ्याने बेदम मारले, अभिनेत्रीने सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याविरोधात कौंटुबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. हे प्रकरण ताजे असतानाच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकारांबाबत सांगितले आहे.

170630508_448132169814252_4148000515029103588_n

माझ्या पतीने पहाटे चार वाजता मला मानेला धरुन खेचत बाथरुममध्ये नेले व तिथे मला बेदम मारहाण केली अशी धक्कादायक माहिती प्रसिद्ध अभिनेत्री आरझू गोवित्रीकर हिने दिली आहे. आरझूने पती सिद्धार्थ सबरवाल विरोधात 2019 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती मात्र आता तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आरझूने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.

40264256_2139058699521618_5670805942599391004_n

‘माझा पती दारुच्या नशेत मला मारझोड करायचा. मारहाणीचे व्रण दिसू नये म्हणून मी घराबाहेर जाणे देखील सोडले होते. एके दिवशी तो नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला. त्यावरून आमचा वाद झाला. त्यानंतर त्याने मला मानेला पकडून खेचत बाथरुममध्ये नेले. तिथे त्याने मला बेदम मारले. माझ्या पोटाता लाथा मारल्या’, असे आरझूने सांगितले.

65603589_482492805838604_7988184434734575645_n

‘मी माझ्या लग्नाला वाचवायचा खूप प्रयत्न केला. मात्र आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता मी ते सर्व नाही सहन करू शकत. त्यामुळे मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. माझ्याकडे बरेच सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यामुळे मला घटस्फोट सहज मिळेल’, असेही आरझू सांगते

36085657_268546570374261_3353076630070231040_n