
भाजप नेते आणि वांद्रे पश्चिम मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभेतील विविध विषयांवरील भाषणांचे संकलन असलेल्या ‘मुद्देसूद 2’ हे पुस्तक भेट दिले. सोशल मीडियावर ट्वीट करून शेलार यांनी या भेटीची माहिती दिली आहे. यावेळी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांची आज मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. विधानसभेतील विविध विषयांवरील भाषणांचे संकलन असलेल्या “मुद्देसूद 2” हे पुस्तक भेट दिले. pic.twitter.com/j5KxaiWqjT
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 7, 2019
























































