मुंबई महापालिका काँग्रेस गटनेतेपदी अश्रफ आझमी

मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस गटनेतेपदी अश्रफ आझमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नवे महापौर यांच्याकडून सभागृहात केली जाणार आहे. काँग्रेसने वंचित बहुजनबरोबर आघाडी करून मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या 24 जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ आझमी यांची काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.