
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. 1995 बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या भिडे यांच्यासह चार वरिष्ठ सनदी अधिकार्यांना प्रधान सचिवपदी बढती मिळाली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, आंतरराज्य प्रतिनियुक्तीकर आंध्र प्रदेशात कार्यरत असलेल्या राधिका रस्तोगी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विकास रस्तोगी यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे या अधिकार्यांना बढती मिळाली असली तरी ते सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीच कार्यरत राहणार आहेत.



























































