Asia Cup 2018 : हिंदुस्थान-पाकिस्तानचा महामुकाबला! चर्चा तर होणारच…

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आशिया कप स्पर्धेला उद्या शनिवारपासून सुरुवात होत असून सर्वांना उत्सुकता आहे की हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक स्पर्धकांमधील मुहामुकाबल्याची. 15 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये हिंदुस्थान 19 सप्टेंबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानला तगडी लढत देण्यासाठी उतरेल.

Asia Cup 2018 : स्पर्धा सुरु होण्याआधीच धक्का, मोठा खेळाडू बाहेर

आशिया कपमध्ये यंदा 6 संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप ए मध्ये हिंदुस्थानसह पाकिस्तान आणि हॉन्गकॉन्गचा संघ तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तानचा समावेश आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हॉन्गकॉन्गशी होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेला आशिया कप जिंकणारा हिंदुस्थानचा संघ यंदा गतविजेतेपद कायम राखण्यासाठी उतरणार आहे.

जाणून घेऊया या स्पर्धेबाबत काही खास गोष्टी
> यंदाचा हा 14 वा आशिया कप असून याची सुरुवात 1984 ला झाली होती.
> आशिया कप एकदिवसीय आणि टी-20 या फॉर्मेटमध्ये होतो. यंदा एकदिवसीय फॉर्मेट असणार आहे.
> आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी हिंदुस्थानचा संघ आहे. हिंदुस्थानने एकूण सहावेळी आशिया कपवर नाव कोरले आहे. यात 5 एकदिवसीय आणि एक टी-20 कप आहे.
> आशिया कपमधील सर्वात यशस्वी फलंदाज श्रीलंकेचा सनथ जयसूर्या असून त्याच्या नावावर 1220 धावांची नोंद आहे.
> श्रीलंकेचाच मुथय्या मुरलीधरन सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याच्या नावावर30 विकेट्सची नोंद आहे.

आशिया कपचे विजेते

– 1984 (शारजाह) विजेता : हिंदुस्थान
– 1986 (श्रीलंका) विजेता : श्रीलंका
– 1988 (बांग्लादेश) विजेता : हिंदुस्थान
– 1990-91 (हिंदुस्थान) विजेता : हिंदुस्थान
– 1995 (यूएई) विजेता : हिंदुस्थान
– 1997 (श्रीलंका) विजेता : श्रीलंका
– 2000 (बांग्लादेश) विजेता : पाकिस्तान
– 2004 (श्रीलंका) विजेता : श्रीलंका
– 2008 (पाकिस्तान) विजेता : श्रीलंका
– 2010 (श्रीलंका) विजेता : हिंदुस्थान
– 2012 (बांग्लादेश) विजेता : पाकिस्तान
– 2014 (बांग्लादेश) विजेता : श्रीलंका
– 2016 (बांग्लादेश) विजेता : हिंदुस्थान

आपली प्रतिक्रिया द्या