
सामना ऑनलाईन । कौलालंपूर
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुजा पाटील यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. हिंदुस्थानी महिलांनी दुसऱ्या लढतीत थायलंडचा ६६ धावांनी धुव्वा उडविला. वुमन ऑफ दि मॅचची माळ हरमनप्रीत कौरच्या गळ्यात पडली. हिंदुस्थानकडून मिळालेल्या १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडचा डाव ८ बाद ६६ धावांवरच मर्यादित राहिला. आता तिसऱ्या लढतीत हरमनप्रीत कौर आणि कंपनीची गाठ बांगलादेश संघाशी पडणार आहे.





























































