
आशियातील पहिली महिला लोको पायलट असलेल्या सुरेखा यादव 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. भारतीय रेल्वेतील 36 वर्षांच्या तेजस्वी, गौरवशाली कामगिरीबद्दल त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील अविस्मरणीय अनुभव तसेच अनेक सुखद आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला. त्यांनी वंदे भारत, डेक्कन क्वीन, राजधानी, पुष्पक यांसारख्या आयकॉनिक गाड्या चालवल्या. कामातील शिस्त आणि समर्पणामुळे त्या रेल्वे खात्याबरोबर संपूर्ण समाजातील नोकरदार महिलांसाठी ‘आदर्श’ बनल्या आहेत.