टिकटॉक जोमात, राष्ट्रवादीवाले कोमात; दीपाली सय्यद यांचे आव्हाडांना ‘फुल टू टेन्शन’

12092
deepali-sayyad-jitendra

#MahaElection 2019 कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार दीपाली सय्यद यांचा भलताच धसका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. दीपाली सय्यद यांच्या जुन्या चित्रपटांचे ‘टिकटॉक’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नादात महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे अरे तिचा प्रचार कशाला करता, अशी तंबीच आव्हाडांनी उत्साही कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यांच्या या ‘प्रेमळ’ सल्ल्याचे रेकॉर्डिंगच सर्वत्र व्हायरल झाल्याने आता आव्हाडांचीच पंचाईत झाली आहे.

दीपाली सय्यद यांनी कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचार फेऱ्यांना स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दीपाली सय्यद यांचे जुने टिकटॉक व्हिडीओ सर्वत्र पसरवले जात आहेत. या व्हिडीओंमुळे सय्यद यांची लोकप्रियता आणखीनच वाढत असून त्यांच्या या सुसाट प्रसिद्धीमुळे आव्हाडांना घामटा फुटला आहे. त्यामुळे या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कार्यकर्त्यांना आव्हाडांनी चांगलेच झापले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या