उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदासाठी अभिनंदन- फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-assembly-n

  • मी पुन्हा येईन असं म्हणालो होतो पण कधी ते सांगितलं नव्हतं- फडणवीस
  • लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी घडत असतात.
  • विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नाही, तर वैचारिक विरोधासाठी इथे बसलो आहोत.
  • नियम आणि संविधानापलिकडे जाऊन काम करणार नाही- फडणवीस
  • उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदासाठी अभिनंदन- फडणवीस
  • विरोधात बसायचा आम्हाला अनुभव- फडणवीस
  • शपथ घेतेवेळी कुठल्याही महापुरुषांचे नाव घ्यायला मनाई नाही- फडणवीस
  • अपक्ष उमेदवारांकडूनही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन
  • तोंड दाबण्याचा प्रयत्न करू नका- छगन भुजबळ
  • मी परत येईन ही जी तुमची भूमिका होती त्यात तुम्ही कुठे बसेन हे सांगितलं नव्हतं – जयंत पाटील
  • बाळासाहेब विखे पाटील यांना आमच्याकडे ओढून आणू – जयंत पाटील
  • देवेंद्र फडणवीस यांना मी विरोधी पक्ष नेता म्हणणार नाही. त्यांना मी एका जबाबदार पक्षाचा नेता म्हणेन
  • सगळेच इथे संघर्ष करून आले आहेत. त्या संघर्षाचे आपण आनंदात रुपांतर करूया.
  • आपल्यावर जी जबाबदारी आलीय ती पार पाडूया
  • एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी आपल्याला इथे बसवलेले नाही.
  • विरोधी हा शब्द बाजूला काढूया व ज्यांनी आपल्याला इथे बसवलं त्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊया
  • विरोधी पक्ष व आपल्यात अंतर ठेवूया नको
  • तेव्हाही माझी सहकाऱ्यांना ताकीद होती की स्पष्ट बोलायचं, काळोखात काही करायचं नाही
  • गेल्या पाच वर्षात मी या सरकारला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही – उद्धव ठाकरे
  • दिलेला शब्द पाळणे हे देखील माझे हिंदुत्त्व आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मला शेतकऱ्य़ांना चिंतामुक्त करायचे आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • 1995 साली सत्ता आली तेव्हा मी आपण एकत्र होतो. तेव्हा शरद पवार म्हणालेले की हे सरकार नवीन आहे त्यांना सहा महिने मी काही विचारणार नाही
  • इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये ही आपण काळजी घेतली पाहिजे
  • आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात काय सांगितलं ते सांगायची संस्कृती नाही.
  • सर्वांनी निवडणूका एकाच कारणासाठी लढलोय मग विरोध कसला करायचा – मुख्यमंत्री
  • 25-30 वर्ष मित्र होते ते आता विरोधक झालेयत, आणि विरोध होेते ते मित्र झालेयत – मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
  • देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी निवड
  • मी कडक अध्यक्ष आहे असा शेरा जाऊ नये याची मी काळजी घेईन पण ती तुम्हीही घ्या. व कुणावरही कारवाई होईल असे कारवाई होणार नाही याची खात्री घ्या – नाना पटोले
  • सत्ताधारी व विरोधी पक्ष जेवढे सक्षम तितके हे सभागृह व्यवस्थित चालेल
  • कुणावरही अन्याय होणार नाही याची मी ग्वाही सर्वांना देते
  • विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मानले सर्व सदस्यांचे आभार
  • राज्यातील सर्व जनतेला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे – अजित पवार
  • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न तुम्ही सातत्याने केले आहे. – बाळासाहेब थोरात
  • सभागृहाला अत्यंत योग्य अध्यक्ष मिळाला – बाळासाहेब थोरात
  • सभागृह सांभाळणं, 288 जणांना सांभाळणं, कामकाज चांगलं झालं पाहिजे. त्यामुळे हे काम कोण चांगलं काम करणार यावर चर्चा केल्यानंतर नाना पटोले यांचं नाव निश्चित झालं.
  • काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केले अध्यक्ष महोदयांचे स्वागत
  • प्रत्येकाला आपले प्रश्न मांडायचे असतात. त्यांना कायदे मांडायचे असतात.
  • एकदा त्या खुर्चीवर बसलं की डाव्या बाजूचं ऐकायला येत नाही – जयंत पाटील
  • शिवसेना नेते व आमदार एकनाथ शिंदे यांनी केले अध्यक्ष महोदयांचे स्वागत
  • अध्यक्ष महोदय कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी आपण मार्ग काढाल असा विश्वास मी व्यक्त करतो
  • विरोधी पक्षाचं सर्व सहकार्य आपल्याला लाभेल
  • महाराष्ट्राच्या विधानसभेचे नावलौकीक आहे. ज्या विधानसभेच्या चर्चांची उंची मोठी आहे अशा विधानसभांमध्ये महाराष्ट्राचं नाव आहे.
  • आम्हाला आनंद आहे की एकमताने ही निवड झाली.
  • सत्ताधारी पक्षांचे नेते व हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आम्हाला विनंती केल्याने आम्ही किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला.
  • एक अनुभवी व्यक्ती या मोठ्या पदावर बसला याचा मला आनंद आहे – फडणवीस
  • विरोधी पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांनी केले नव्या अध्यक्षांचे अभिनंदन
  • वेळ प्रसंगी आम्ही चुकलो तर आमचे कान देखील पकडा
  • सभागृहाचा नेता म्हणून मी ही अपेक्षा करतो की अध्यक्षमहोदय आपण अन्याय होऊ देणार नाही
  • आम्हाला सांभाळून घेणं हे आपलं काम आहे.
  • आता आपली जबाबदारी वाढली आहे
  • अन्याय सहन न करणारे असे तुम्ही बंडखोर स्वभावाचे आहात. कुणाचीही पर्वा न करता आपलं मत मांडता
  • अध्यक्ष महोदय हे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱी कुटुंबातून आले आहे.
  • उद्धव ठाकरे यांनी केले अध्यक्ष महोदयांचे स्वागत
  • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
  • महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोधी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  • विरोधी पक्षनेतेपदाची निवडही आज होणार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळात पोहोचले
  • भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांना अर्ज मागे घ्यायला लावला – चंद्रकांत पाटील
  • त्यामुळे मी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली त्यामुळे आम्ही अध्यक्षांचं पद वादात न आणण्याचा निर्णय घेतला.
  • सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ही निवड वादा शिवाय व्हावी यासाठी आम्हाला संपर्क केला होता – चंद्रकांत पाटील
  • महाराष्ट्राची प्रथा आहे की विधानसभा अध्यक्ष वादादीत असावी – चंद्रकांत पाटील
  • महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड
  • भाजपचे किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेतला
  • अध्यक्षपद निवडीसाठी गुप्त मतदान होण्याची भाजपची मागणी
  • विधानभवनात सर्व पक्षीय बैठक सुरू