
राज्यात लॉकडाऊनच्या काळात मजुरांना राज्य सरकारच्या वतीने 176 कोटी 83 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रमोद पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली. राज्यातल्या 11 लाख 78 हजार 928 नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने ही रक्कम जमा करण्यात आली.
























































