सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास लांबणीवर

हिंदुस्थानी वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा अंतराळातून पृथ्वीकडे येण्याचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा लांबला. बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान या महिन्यात आपली सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी तयार आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पर्यंत अंतराळ प्रवाशांना ने-आण करण्यासाठी हे प्रोजेक्ट तयार करण्यात आले आहे. स्टारलाईनरने आपले लक्ष्य अर्धे पूर्ण केले आहे. परंतु, अंतराळ स्टेशनवरील प्रवास दुसऱयांदा वाढवण्यात आला आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर 6 जूनला स्टारलाईनरवरून अंतराळ स्टेशनवर पोहोचले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, सुनीता विल्यम्स केवळ एक आठवडा या ठिकाणी राहील. परंतु, फ्लाइट दरम्यान हीलियम लीक आणि थ्रस्टर्स अचानक बंद झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे 26 जून आधी परतणार होते. परंतु, नासाने सांगितले की, मिशन कमीत कमी 20 दिवसांपर्यंत वाढवले आहे.