सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 38 जणांचा मृत्यू

तामीळ सुपरस्टार विजय याची शनिवारी संध्याकाळी तामीळनाडूतील करूर येथे विराट सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तुफान गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ बालकांचा देखील समावेश आहे. यात 100 हून अधिक लोक जखमी झाले असून काहीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे.

.तामीळनाडूत 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयने स्वत:च्या पक्षाची स्थापना केली आहे. विजयच्या या पक्षाला तामिळनाडूत मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयने  करूर येथे सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेतील गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन चेंगरा चेंगरी झाली.