
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना युरिन इन्फेक्शन आणि किडनीच्या त्रासामुळे गेल्या काही महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर डायलिसिस देखील करण्यात येत आहे. मात्र अटलजींना फक्त हेच आजार नसून त्यांना डिमेंशिया असा दुर्धर आजार आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीचा हळूहळू स्मृतीभ्रंश होण्यास सुरुवात होते. वाजपेयींचे देखील तसेच झाले असून ते गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला ओळखत नसल्याचे समजते.
काय आहे डिमेंशिया
डिमेंशिया हा आजार ६० ते ८० टक्के अलझायमर सारखाच आहे. हा आजार झालेल्या व्यक्तींचा स्मृतीभ्रंश होतो. त्यांना त्यांच्या आयुष्यातील काहीच गोष्टी लक्षात राहत नाही. अशा व्यक्ती सतत चीडचीड करतात, चिंता करतात, दुखी राहतात. जसा जसा या आजाराचा प्रभाव रुग्णावर वाढत जातो रुग्णाची प्रकृती अधिक खालावत जाते. मानसिक आजारपणामुले हळूहळू शरीरही साथ देणं कमी करत जातं. हा आजार झालेल्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. वयाच्या ६५ वर्षानंतर हा आजार जडण्याची शक्यता जास्त असते.
आजाराची लक्षणं
नाव, ठिकाण, नुकतीच केलेला संवाद विसरणं
शब्द विसरायला लागणे
अन्न गिळायला त्रास होणे
चालायला फिरायला त्रास होणे
निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवणे
























































