सेव्हन हिल रुग्णालयाची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीवीर लव यादवचे अर्धशतक व अष्टपैलू हर्षद जाधवची निर्णायक क्षणी नाबाद 15 धावांची फलंदाजी यामुळे अंधेरीच्या सेव्हन हिल हॉस्पिटलने नवी मुंबईच्या बलाढय़ रिलायन्स हॉस्पिटलचा एक गडी राखून पराभव केला आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमी आयोजित आंतर-हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धेची उद्घाटनीय लढत जिंकली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने शिवाजी पार्प येथील क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन भारतीय कामगार सेनेचे सेव्रेटरी संजय कदम, संघटन समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व विराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

सेव्हन हिल हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून रिलायन्स हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. रिलायन्स हॉस्पिटलचा सलामीवीर संजू जांगीड (25 धावा) व बॉबी जोस (16 धावा) यांनी सातव्या षटकाला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर सचिन गडकरी (22 धावा) व संदीप देशमुख (12 धावा) यांनी रिलायन्स हॉस्पिटलला 20 षटकांत 8 बाद 158 धावांचा पल्ला गाठून दिला. सेव्हन हिल हॉस्पिटलचा सलामीवीर लव यादव (54 धावा), नवव्या स्थानावर फलंदाजीस उतरलेल्या हर्षद जाधवने (नाबाद 15 धावा) निर्णायक क्षणी 2 चौकार ठोकून 9 बाद 159 अशी विजयी धावसंख्या रचत सेव्हन हिल हॉस्पिटल संघाच्या बाजूने सामना झुकविला.