नितीश कुमारांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला; 11 हल्लेखोरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री, जेडीयूचे नेते नितीशकुमार यांच्या ताफ्यातील गाडीवर रविवारी पाटण्यात हल्ला झाला. हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली. सुदैवाने हल्ला झालेल्या गाडीमध्ये नितीशकुमार नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. नितीशकुमार यांनी नुकताच भाजपला झटका देत बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन केले आहे. याचदरम्यान हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाटण्यातील गौरीचकच्या सोहगी मोड परिसरात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दगडफेकीत नितीशकुमार यांच्या ताफ्यातील तीन ते चार गाडयांच्या काचांचे नुकसान झाले आहे. एका स्थानिक नागरिकाच्या मृत्यूनंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यादरम्यान नितीशकुमार यांच्या गाडय़ांचा ताफा चालला होता. यावेळी जमावाने गाडय़ांवर दगडफेक केली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावावर लाठीमार केला.