
सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम
युवाजन श्रमिक रायथू कांग्रेस पार्टी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे चिरंजीव जगन मोहन रेड्डी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. श्रीनू असे या हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. ब्लेडने केलेल्या हल्ल्यात जगन मोहन जखमी झाले आहेत.
Police on the attack on YSRCP leader Jaganmohan Reddy (in pic) at Visakhapatnam airport today, say, “the attacker has been identified as Srinu who is working as a waiter at the airport lounge. He is from East Godavari district. The attacker has been taken into custody.” pic.twitter.com/4v1AXwLQzc
— ANI (@ANI) October 25, 2018
विशाखापट्टणम विमानतळावर लाऊंजमध्ये वेटरचे काम करणाऱ्या श्रीणूला जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत सेल्फी काढायचा होता, त्यामुळे रेड्डी यांनी त्याला भेटण्याची परवानगी दिली. यावेळी श्रीणूने जगन मोहन यांच्यासोबत सेल्फी काढला आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने कोंबड्यांच्या झुंजीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ब्लेडने जगन मोहन रेड्डी यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेतले.





























































