
पंजाब नॅशनल बॅंकेच्या 23 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांच्या लिलावाला विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
विशेष न्यायाधीश ए.व्ही. गुजराती यांनी ही परवानगी दिली. मालमत्ता अशाच पडून राहिल्या तर त्यांची किंमत सतत कमी होत जाईल. यासाठी त्यांचा लिलाव तत्काळ व्हायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या लिलावातून मिळणारी रक्कम आयसीआयसीआय बँकेत फिक्स डिपॉझीट स्वरुपात ठेवावी, असे आदेशही न्यायालयाने लिक्विडिटरला दिले आहेत. मेहूल चोक्सी फरार असून बेल्जियमच्या तुरुंगात आहे.
या मालमत्तांचा होणार लिलाव
बोरिवलीतील फ्लॅट (2.6 कोटी रुपये)
बीकेसीमधील भारत डायमंड बोर्समधील कार्यालय व कार पार्ंकगची जागा (19.7 कोटी)
गोरेगाव येथील सहा फॅक्ट्रीज् (18.7 कोटी)
चांदीच्या विटा, मौल्यवान रत्ने व कंपनीच्या मशीनरी




























































