प्रेक्षकांना भावतेय ‘नमुने’

7

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘नमुने’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतेय. मालिकेतील निरंजन ही व्यक्तिरेखा जगण्याची सकारात्मक ऊर्जा देतेय. निरंजन म्हणजेच कुणाल कुमार याच्या आयुष्यात आता त्याचा शायर बनलेला मित्र शशी सारंग याची एंट्री होत आहे. शशीची भूमिका आस्ताद काळे साकारत आहे. गंभीर वृत्तीचा शशी लोकांना सनकी स्वभावाचा वाटतो. कारण तो सतत शेरोशायरीच्या माध्यमातून संवाद साधतो.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेत कसं जगायचं, याचा संदेश शशी निरंजनला आणि प्रेक्षकांना देणार आहे. आस्तादची ही पहिलीच हिंदी मालिका आहे. ‘सोनी सब’वरील ‘नमुने’ मालिकेत काम करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. निर्माती सपना वाघमारे जोशी यांच्यासोबत कामाचा अनुभव खूप उत्कृष्ट होता. मी आशा करतो की, प्रेक्षकांना माझे काम आवडेल, अशी प्रतिक्रिया आस्तादने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या