
खटाव तालुक्यातील औंध येथील मूळपीठगडावर अष्टमी उत्सव बुधवारी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी मूळपीठगडावर अष्टमी उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी उसळते. मात्र, सलग दुसऱया वर्षी मूळपीठगडावर देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजकन्या चारुशीला राजे यांच्या हस्ते पारंपरिक व षोडशोपचारे पद्धतीने देवीचे पूजन करून देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा मारली. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने अष्टमी उत्सवाचा सोहळा पार पडला.
यावेळी जितेंद्र पवार, संदीप मांडवे, शंकरराव खैरमोडे, हणमंतराव शिंदे, आब्बास आत्तार, राजेंद्र माने, दीपक नलवडे, संतोष भोसले, गणेश देशमुख, दीपक कदम, शैलेश मिठारी, शाकिर आत्तार, प्रदीप कणसे, संजय निकम, गणेशशास्त्राr इंगळे, उमेश थोरात, देवीचे मानकरी, पुजारी उपस्थितीत होते.
दरम्यान, प्रथेप्रमाणे मूळपीठ डोंगरावरील विविध देवतांचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी मंत्रपुष्पांजली, आरती, आदी धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पडले. त्यानंतर फळांचे वाटप करण्यात आले.
























































