औंधमध्ये घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने चोरीला

332

फ्लॅटच्या उघड्या दरवाजाचा फायदा घेउन चोरट्यांनी कपाटातील 1 लाख 25 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना औंधमधील सुरभी एनक्लेव्ह सोसायटीत घडली.याप्रकरणी शेफाली नलावडे (वय 54, रा. औंध) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली गृहिणी असून कुटुंबीयासोबत सुरभी एनक्लेव्ह सोसायटीमध्ये राहायला आहेत. त्यांच्याकडून फ्लॅटचा दरवाजा चुकून उघडा राहिला असता, चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून 1 लाख 25 हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या