पैठणचे संतपीठ लवकरच सुरू करणार – सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठणच्या संतपीठासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, त्यासाठी सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, एक महिन्यात अहवाल देण्याचे समितीला सांगण्यात आले आहे. त्यामुळे पैठणचे संतपीठ लवकरच सुरू होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि मुलींच्या वसतिगृहास स्व.यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतिगृह असे नामकरण तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पैठणला संतपीठ व्हावी, ही अनेक वर्षांची मागणी आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव देण्यात आला होता मात्र, तो प्रस्ताव प्रलंबित आहे, हे नमूद करून उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले, पैठणच्या संतपीठासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरच हे संतपीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या विद्यापीठात कोणता अभ्यासक्रम असावा, कर्मचारी तसेच अन्य स्ट्रक्चर यासंबंधी निर्णय घेण्यासाठी सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली असून, 30 दिवसांत अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे, असेही सामंत म्हणाले.

राज्यातील विद्यापीठांचे आणि विद्यापीठस्तरावरील विविध प्रश्न, संस्थाचालकांचे प्रश्न त्या-त्या ठिकाणी जिल्हावार बैठका घेऊन मार्गी लावण्याचा अभिनव उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हाती घेण्याचे ठरविले आहे. याची सुरुवात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर केली जाणार आहे. याची सुरुवात गडचिरोली विद्यापीठातून केली जाणार आहे, अशी घोषणा तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी केली. जिल्हावार बैठकांसाठी मंत्री म्हणून मी स्वत: खात्याचे वरिष्ठ अधिकारी, सचिव सोबत असणार आहेत. स्थानिक पातळीवरील सर्व प्रश्न तेथेच सोडविले जाणार आहेत, असेही ते म्हणाले. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपण पुन्हा जिल्ह्याचा दौरा करणार आहोत, त्यावेळी विद्यापीठाच्या कारभाराचा आढावा, विद्याथ्र्यांशी संवाद साधला जाणार आहे, असेही ते म्हणाले. या विद्यापीठात जे काही चांगले-वाईट घडले, त्याची चौकशी केली जाणार, चांगले काम करणाNयांना प्रोत्साहन आणि दोषींना शिक्षा, असे धोरण आपण राबवू असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रसिध्द विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर, डॉ. फुलचंद सलामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.