
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलला मानसिक आजार जडला असून आयुष्याच्या सर्वात कठीण काळातून तो जात आहे. यामुळे त्याने सध्या क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे. ग्लेनला मानसिक विकार जडल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांना, मित्रांना नातेवाईकांना धक्का बसला आहे. तर मैदानात गोलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या ग्लेनला असे अचानक काय झाले कि त्याला क्रिकेटच सोडावे लागले. असा प्रश्न क्रिकेटविश्वात चर्चिला जात आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर मायकल लॉईड यांनीही यास दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते मॅक्सवेलचे मानसिक आरोग्य ढासळले आहे. यामुळे काही दिवसांसाठी त्याने क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेल श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिकेत खेळला होता. पण आता त्याच्या जागी डासी शॉर्टची निवड करण्यात आली आहे.




























































