ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने केला टीम इंडियाचा खेळ खल्लास, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पराभव करत मालिका खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले जात असले तरी दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणानेही गेम पालटला आहे.

कर्णधार विराट कोहली व श्रेयस अय्यर हे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे पॅव्हेलियनमध्ये माघारी परतले. विराट कोहली हा सामना पलटवू शकत होता. त्यामुळे या स्फोटक फलंदाजाला परत पाठवणे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठे काम होते. या कामात हेनरिकने जराही चूक केली नाही. हेजलवूडच्या गोलंदाजीवर हेनरिकने हवेत उडी घेत विराटचा झेल घेतला व तिथेच टीम इंडियाचा पराभव समोर दिसू लागला.

त्यानंतर श्रेयस अय्यर याला बाद करण्यासाठी कर्णधार स्टिव्ह स्मिथने देखील कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. हवेत उडी घेत त्याने श्रेयसचा झेल घेतला व त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हे दोन्ही कॅच इतके अफलातून होते की आयसीसीने या दोन्ही कॅचचे व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या