प्रसुतीच्या दहा मिनिटे आधी कळाले गर्भवती असल्याचे, महिलेला बसला जबरदस्त धक्का

4647

सर्वसाधारणपणे गर्भवती महिलेल्या प्रसववेदना सुरू झाल्यानंतर प्रसुतीसाठी कक्षात नेलं जातं. मात्र एका महिलेला प्रसुतीपूर्वी 10 मिनिटे आधी ती गर्भवती असल्याचं कळालं. ही महिला एक प्रसिद्ध मॉडेल असून ही नेमकं कसं झालं या प्रश्नामुळे सगळे जण हैराण झाले आहेत. या महिलेने बाळाला जन्म दिला असून ते दोघेही सुखरूप आहेत.

एरीन लँगमेड असं या मॉडेलचं नाव असून ती ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. एरीनने सांगितलं की बाळाला जन्म देण्याच्या 10 मिनिटांपूर्वी तिला आपण गरोदर असल्याचे कळाले. गर्भवती असल्याचे माहितीच नसल्याने तिने रुग्णालयात नाव नोंदवलेलं नव्हतं. बाथरूममध्ये असतानाच ती प्रसूत झाली. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं असून त्यात म्हटलं आहे की प्रसुती झाल्यानंतर बाळाचे वजन आठ पाऊंड इतके होते.

या घटनेबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले की अशा गर्भधारणेला वैज्ञानिक भाषेत ‘गुप्त गर्भधारणा’ म्हणतात. 2,500 पैकी एकाच महिलेबाबत असं घडतं. अशा परिस्थितीत स्त्रीला तिच्या गर्भधारणेबद्दल माहिती नसते आणि तिला शारीरिक बदल जाणवत नाही. एरीनने पत्रकारांशी बोलताना सांगितले की तिला प्रसुतीमध्ये होतो तसा कोणताही त्रास झाला नाही. तिचं पोटही वाढलेलं नव्हतं आणि ती वेळोवेळीही गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. तरीही गर्भार राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


View this post on Instagram

The hardest week of our lives, you are my rock. And now you are Isla’s. 2 years with you

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

आपली प्रतिक्रिया द्या